*शिंदखेडा येथील महिला मंडळ निघाले बसने पंढरपूर वारीला. पंधरा वर्षापासून वारी करताय महिला पन्नास हुन अधिक महिला व पुरुषांचा समावेश*. शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :- येथील माळीवाडा, गुरव गल्ली, जनता नगर आदी शहर व परिसरातील जवळपास पन्नास हुन अधिक महिला व पुरुष शिंदखेडा येथुन एसटी बसने शिवसेना महिला आघाडीच्या रत्नाताई नारायण गुरव यांच्या नेतृत्वात पंढरपुरला मार्गस्थ झाल्यात. सदरील महिलांची ही पंधरावी पंढरपूर वारी असल्याचे सांगितले.हयावेळी शिवसेना तालुका प्रमुख अनिल जगताप, महिला आघाडी प्रमुख रत्नाताई गुरव, वच्छलाताई माळी शोभाताई माळी यासह महिला पदाधिकारी व कार्यकर्ते शिंदखेडा बस आगारात शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. पंढरपूर ला विठ्ठल रुखमाई माऊली चे दर्शन घेतल्यावर जेजुरी, आळंदी, देहु, पैठण यासह अनेक ठिकाणी देवदर्शनाला जाणार असल्याची माहिती रत्नाताई गुरव यांनी सांगितले.



















