*शिंदखेडा शहरातुन नवीन ट्रक्टरची चोरी मोबाईल जीपीएसच्या साहयाने ट्रक्टरचा शोध* शिंदखेडा माझा(यादवराव सावंत) संपादक:-. शिंदखेडा शहरातील जाधवनगर भागात एका शेतकऱ्याने खरेदी केलेल्या नवीन ट्रॅक्टरला अजून आरटीओकडून नंबर मिळाला नव्हता. अशातच घरासमोरून ट्रॅक्टर चोरी झाले; परंतु ट्रॅक्टरला असलेले जीपीएस मोबाइलला कनेक्ट केलेले असल्याने चोर ट्रॅक्टर कोठे घेऊन जात आहेत, हे कळाल्यानंतर शेतकरी कुणाल पाटील यांनी पोलिसांच्या मदतीने तत्काळ ट्रॅक्टरचा शोध लावला. जाधवनगरातील कुणाल गणेश पाटील यांनी रात्री घरासमोर लावलेले ट्रॅक्टर चोरांनी पळवले. ट्रॅक्टर नवीनच असल्यामुळे अधिकृत नंबरही मिळालेला नव्हता. पहाटे चार वाजता कुणाल पाटील घराबाहेर आल्यानंतर त्यांना ट्रॅक्टर गायब असल्याचे आढळून आले. त्यांनी तत्काळ जीपीएसचे लोकेशन तपासले, त्यात चोरट्यांनी वरुळ, घुसरे, चौगाव या मार्गाने दोंडाईचा येथील सिंघी कॉलनीजवळ असलेल्या स्टार्च फॅक्टरी रस्त्याने लोकेशन दाखवले. पोलिस कॉन्स्टेबल शेख व रूपेश चौधरी यांनी ट्रॅक्टरचा माग काढला.सदरील ट्रक्टर मालक यांनी शिंदखेडा पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवली होती.त्यानुसार पोलीस चक्र फिरवुन मोबाईल कनेक्ट जीपीएस च्या मदतीने चोरट्याचा मागोवा लागण्यास मदत झाली. शेतकरी शेतात ट्रक्टरचा बरेपैकी वापर करु लागल्यावर आवक वाढली आहे. शहरातुन मोटारसायकल सह आता ट्रक्टर चोरण्यास हिम्मत दाखवित असताना दिसु लागले आहेत म्हणून रात्रीची पोलीस गस्त वाढवावी अशी शेतकरी मागणी करू लागली आहेत. मालक व पोलीस अधिकारी यांच्या दक्षतेने, समय सुचकतेने पुढील अनर्थ टळला येवढ मात्र नक्की..



















