*शिंदखेडा शहरातील विठ्ठल रुख्मिणी मंदिरात भजनी मंडळ सदस्यांचा सन्मान भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले कडून सन्मान ् ✍️ शिंदखेडा माझा संपादक (यादवराव सावंत ) :-. आषाढी एकादशीच्या दिनी शिंदखेडा शहरातील विठ्ठल मंदिरात श्री.विठ्ठल-रुक्मिणी माऊलींचं भाविक भक्तांनी मनोभावे दर्शन घेवून पुजा करून भक्तीमय वातावरणात भजन संपन्न झाले.यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष सुरज देसले यांच्या वतिने भजनी मंडळ सदस्य याचा सन्मान करण्यात आला.भाविकांच्या भक्तीने भारलेलं वातावरण, टाळ-मृदंगाच्या गजरात “ज्ञानोबा माऊली तुकाराम…” चा जयघोष…या क्षणी देव आणि भक्त एकरूप झाले होते.!
यावेळी भाजपा युवा मोर्चा जिहाध्यक्ष सुरज देसले,श्री.नाना महाराज,श्री.सोमनाथ पिले,श्री.चंदुशेठ विसपुते,सुनील पिंपलिसकर,राजेंद्र बोरसे,योगेश शिंपीं,सुरेश देसले,भानुदास शिंदे,विपुल चौधरी,मुकेश थोरात,अनिकेत शिंपी,राहुल जोशी,पंकज गुप्ता,विजय विसपुते,तुषार चौधरी,अक्षय वाणी,कैलास चौधरी,परशुराम मराठे,उदय देसले व भाविक भक्त उपस्थित होते.



















