Homeताज्या बातम्यानवी दिवी गावात एसटी बस सुविधा मिळावी यासाठी ग्रामपंचायत सह शिवसेना शिंदे...

नवी दिवी गावात एसटी बस सुविधा मिळावी यासाठी ग्रामपंचायत सह शिवसेना शिंदे गटाकडुन निवेदन देवुनही ग्रामस्थ वंचित- अन्यथा बसरोको आंदोलन*                                         

नवी दिवी गावात एसटी बस सुविधा मिळावी यासाठी ग्रामपंचायत सह शिवसेना शिंदे गटाकडुन निवेदन देवुनही ग्रामस्थ वंचित- अन्यथा बसरोको आंदोलन*                                                शिंदखेडा माझा(यादवराव सावंत) :-.                शिंदखेडा तालुक्यातील दिवी येथील ग्रामपंचायत पदाधिकारी सह शिवसेना शिंदे गटाच्या वतीने शिंदखेडा बस आगारात जुने दिवी पर्यंतच येणाऱ्या बसेस तिथुनच परतुन न जाता पुर्नवसित नवे दिवी गावापर्यत यावी तर मुक्काम बस देखील त्याच गावात थांबावी यासाठी गेल्या एक वर्षापासून मागणीचे निवेदन देवुनही शिंदखेडा आगारप्रमुखानी सपसेल केराची टोपली दाखविल्याने ग्रामस्थ प्रवाशी सत्तप्त झाले असुन शिवसेना शिंदे गटाचे दिवी शाखाप्रमुख गुलझारसिग गिरासे यांनी सदरची मागणी चा विचार न झाल्यास शिवसेना स्टाईल ने तिव्र स्वरुपाचे बस रोको आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. सदरचे पहिले निवेदन दि. 30/ 7 /2024 रोजी नवीन दिवी ग्रामपंचायत सरपंच सह शिवसेना शाखाप्रमुख गुलझारसिंग गिरासे सह पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले होते त्यानंतर वारंवार निवेदन व तोंडी विचारपूस करूनही शिंदखेडा आगारप्रमुखांनी याकडे सपशेल दुर्लक्ष केलेले आहे त्यांनी वेळोवेळी एकच मागणी केली आहे की शिंदखेड्यावरून येणारी बस ही फक्त जुने दिवी या ठिकाणी येवुन तिथून परत शिंदखेडा येथे निघून जाते मात्र जुने देवी गावात रहिवासी संख्या खूपच कमी असल्याने 80% पेक्षा जास्त रहिवासी वस्ती नवे दिवी पुनर्वसित गावात वसलेली आहे म्हणून तिथपर्यंत सदरच्या बसेस याव्यात अशी त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे मुक्कामी बस सुद्धा जुने दिवी येथे न थांब ता नवे दिवी या ठिकाणी थांबावी अशी मागणी त्यांनी केली आहे.कारण नवी दिवी ते जुने दिवी बस स्टाप अंतर एक दीड किमी असल्याने प्रवाशांना पायपीट करावी लागते परिणामी काही वेळा बसही सापडत नाही म्हणून प्रवाशांची गैरसोय होत असते.परंतु आगार प्रमुख व संबंधित चालक वाहक यांना विचारले असता नवे दिवी या ठिकाणी कुठल्याही प्रकारची राहण्याची व्यवस्था नाही असे उडवाउडवीची उत्तरं दिली जातात परंतु आज त्या ठिकाणी ग्रामपंचायत तलाठी कार्यालयाजवळ बस स्थानक थांबा असं असताना त्या ठिकाणी पुरेपूर चांगल्या प्रकारची सुविधा उपलब्ध आहे म्हणून चालक वाहक यांचे म्हणणे योग्य नाही त्यांना सुयोग्य अशी सुविधा असतानाही ते जुने देवी गावातच का थांबतात हा ग्रामस्थांचा प्रश्न आहे म्हणून संबंधित शिंदखेडा आगार प्रमुखांनी याकडे लक्ष देऊन जुने दिवी गावात बस नवी दिवी गावापर्यंत यावेत व मुक्कामी बसेस ठिकाणी थांबावेत अशी त्यांची मागणी आहे त्याचप्रमाणे वाडी गावापर्यंत येणारी बस ही सुद्धा रेवाडी मार्गे दिवी पर्यंत करण्यात यावी ही मागणी त्यांनी लावून धरली आहे. निवेदन देतेवेळी शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष मनोज मोरे, तालुकाप्रमुख अनिल जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली दिवी शिवसेना शाखाप्रमुख गुलझारसिंग गिरासे उपशाखाप्रमुख भटू आहिरे गुलझारसिंग खुशाल गिरासे यांसह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते व वारंवार पाठपुरावा करीत आहेत तरी संबंधित आगारप्रमुखांनी याकडे लक्ष द्यावे ही नम्र विनंती अन्यथा येणाऱ्या आठ दिवसात दिवी गावातील रस्त्यावर बस रोको आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना सह ग्रामस्थ प्रवाशांनी दिला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!