Homeताज्या बातम्याशिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ
👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं
👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष
✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव सावंत) :-.   शिंदखेडा शहरातील सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले हे गांधीगिरीच्या माध्यमातून शहरातील विविध विषयांवर प्रकाशझोत टाकून शासन,प्रशासनाला जागे करण्याचे काम गेल्या वर्षापासून करित असून आज शिवाजी चौफुली ते भगव्या चौकापर्यंत स्टेशन रोड हा गेल्या वर्षभरापासून अत्यंत दयनीय अवस्थेत दिसून येत आहे. ठिकठिकाणी सड्ड या उखडलेल्या आहेत.तसेच मोजता येणार नाही एवढे खड्डे या रस्त्यावर पडले असून वाहनधारकास वाहन चालवताना कसरत करावी लागते.अनेक लहान मोठे अपघात देखील झालेले आहेत होत असतात . या पार्श्वभूमीवर आज खान्देशातील पवित्र सण आखाजीच्या (अक्षय तृतीया )दिवशी घरातील पूर्वजांचे व इतरांचे स्मरण करण्यासाठी आणि त्यांना अन्न पाणी अर्पण करण्यासाठी डेरगं भरले जाते या विधीमध्ये मातीची छोटी घागर (डेरगं )याला घागर भरणे असे म्हणतात. सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी आज आखाजीच्या दिवशी शिवाजी चौफुली ते भगव्या चौकापर्यंत रस्त्याच्या मध्यभागी डेरगं भरण्याचा कार्यक्रम आपल्या गांधीगिरी पार्ट नऊच्या माध्यमातून केला. त्यांनी सदर डेरग्याची विधिवत पूजा करून सार्वजनिक बांधकाम खात्याला सदर रस्ता खड्डेमय झाला असून त्याची या माध्यमातून जाग आणून देण्याचे काम केल्याने शिंदखेडा शहरातील समस्त नागरिकांनी आभार व्यक्त केले आहेत.त्यांच्या या कार्याने नक्कीच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जाग येईल का असाही प्रश्न यावेळी करण्यात आला.याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते अरुण देसले यांनी सांगितले की, आज हे आखाजीच्या दिवशी भरले आहे रस्ता राजपथ होईल तेव्हा होईल पण या रस्त्याची सध्यातरी डागडुजी करणे आवश्यक आहे मी या निमित्ताने सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अपेक्षा व्यक्त करतो की त्यांनी निदान लहान-मोठे वाहनधारकांना त्रास होणार नाही म्हणून या स्टेशन रोडवरील संपूर्ण खड्डे बुजवण्यात यावे आणि रस्त्यांची डागडुजी करावी असे त्यांनी सांगितले. या प्रसंगी शहरातील बहुसंख्येने नागरिक व मित्र परिवार यावेळी उपस्थित होते . या गांधीगिरीच्या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र त्यांचे कौतुक केले जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776589654.5b96dfb9 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!