आरक्षण देता येत नसेल, तर शरद पवारांकडे सत्ता द्याः
(प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांचा मुख्यमंत्री फडणवीसांवर हल्ला)
पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील
शशिकांत शिंदे पुण्यातील गणपतींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आरक्षणावर भूमिका जाहीर करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आमची भूमिका मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हीच आहे. मराठा समाज झालं की ओबीसी, ओबीसी झालं की धनगर समाज… आश्वासन देता पण ती पूर्ण करत नाही. दहा-बारा वर्षं सत्तेत राहूनही मार्ग काढता आला नाही, तर सत्ता शरद पवार यांच्याकडे द्या, ते नक्की मार्ग काढतील, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ला चढवला.शशिकांत शिंदे पुण्यातील गणपतींच्या दर्शनासाठी आले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, “आरक्षणावर भूमिका जाहीर करण्याची जबाबदारी सरकारची आहे. आमची भूमिका मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे हीच आहे. पण सत्ताधाऱ्यांनी दिलेलं आश्वासन पूर्ण न झाल्यामुळेच जरांगे पाटील आंदोलन करत आहेत.” महाविकास आघाडी सरकारमध्ये अजित पवार मंत्रिमंडळात होते. त्यांनी त्यांची भूमिका काय होती, हे आताच्या मित्रपक्षांपुढे स्पष्ट करावी, असेही शिंदे म्हणाले समाजात दरी निर्माण करून निवडणुका जिंकण्याचा प्रन होतोय. आंदोलन पेटवायचं आहे की शमवायचं, हे सरकारने ठरवावं. विरोधकांवर खापर फोडण्यापेक्षा कृतीत दाखवा, असे आव्हान शिंदे यांनी दिले.










