डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती उत्साहात साजरी
👉शिंदखेडा येथील युवा झेरॉक्स व ऑनलाइन सेंटर यांची परंपरा कायम
शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत) :-
शहरातील भगव्या चौकाजवळ जय किसान मार्केट शॉपिंग येथे सन -2019 स्थापनेपासून सर्वच महापुरुषांच्या जयंती उत्सव साजरा करण्यात येतो.ही परंपरा सातत्याने सुरु राहणार आहे.दरवर्षी सदर कार्यक्रमास शहरातील शासकीय,प्रशासकीय तसेच व्यापारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित असतात. सदर कार्यक्रम हा बौद्धिक व वैचारिक असल्यामुळे शहरातून युवा झेरॉक्स व ऑनलाइन सेंटरचे मालक राहुल महिरे व राकेश म हिरे यांच्या उपक्रमाची सर्व स्तरावरून स्तुती व स्तृत्य उपक्रम अशी नोंद होत आहे. या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी माजी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, प्रमुख पाहुणे डॉ. पंढरीनाथ पाटील, प्रा. दत्तात्रय ढिवरे व प्रा. डॉ. लक्ष्मण बैसाणे आदींच्या उपस्थितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन तसेच क्रांतीसुर्य महात्मा फुले व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रतिमेचे पूजन देखील यावेळी करण्यात आले याप्रसंगी शिंदखेडा एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष स्वप्निल आबा देसले, माजी उपनगराध्यक्ष युवराज नाना माळी, प्रा. परेश शहा, दयाराम खंडू महिरे, उपनगराध्यक्ष उदय देसले, गटनेते प्रतिनिधी चेतन परमार, माजी उपनगराध्यक्ष उल्हास देशमुख, भिला पाटील, जिल्हा सरचिटणीस प्रवीण माळी,शहराध्यक्ष संजय महाजन,सभापती प्रतिनिधी दादा मराठे, चंद्रकांत सोनवणे, अबू कुरेशी, मनोहर पाटील, नगरसेवक सुयोग भदाणे, ज्ञानेश्वर सकट, गुलाब सोनवणे,संदीप राजपूत, अनुसूचित जाती मोर्चा अध्यक्ष निलेश कापुरे, कुणाल देसले, बिपिन पाटील,राधेश्याम पाटोळे,संतोष कापुरे, दादा माळी, गोपाल चौधरी, आदी समाज बांधवांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. प्रा. पंढरीनाथ पाटील यांनी आपल्या मनोगतात सांगितले की बाबासाहेबांचे विचार आपल्या कृतीतून उतरवा हेच खरे अभिवादन ठरेल. बाबासाहेबांनी केलेला संघर्ष प्रा. दत्तात्रय ढिवरे यांनी आपल्या कवितेतून सादर केला. कार्यक्रमाचे नियोजन राहुल महिरे, राकेश मोरे व निलेश कापुरे यांनी करून अमूल्य सहकार्य केले. समारोप आभार प्रा. लक्ष्मण बैसाने यांनी केले.









