साईनगर येथील सुवासिनींनी गत वर्षी लागवड केलेल्या वडाचे पूजन करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी केली प्रार्थना
शिंदखेडा ( यादवराव सावंत) प्रतिनिधी :– शहरातील साईनगर येथे सुवासिनींनी मागील वर्षी वटसावित्री पौर्णिमेला 10 वडाची लागवड केली होती. लागवड केलेल्या वडाची नियमितपणे देखभाल ठेवल्याने सर्वच रोपे जगली असून आज सर्व सुवासिनींनी वडाचे पूजन करून त्यास प्रदक्षिणा घालत पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.
वट सावित्री सनाला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. त्यानिमित्त पतीचा दीर्घायुष्याची प्रार्थना केली जाते. दि. 10 जून मंगळवार रोजी या सणाचे औचित्य साधून गत वर्षी लागवड केलेल्या 10 वट वृक्षाचे पूजन केले. सुताचा धागा गुंडाळत त्यास प्रदक्षिणा ही घातल्या.
यावेळी रत्नाबाई चौधरी, सारिका चौधरी, रुपाली चौधरी, दिव्या मराठे, शितल कोळी, करिष्मा चौधरी, गायत्री तमखाने, नीता पाटील, अंजली देसले, जिजाबाई बोरसे, पूनम चौधरी उपस्थित होत्या.
परिसरात एकही वड नसल्याने वट पौर्णिमेला पुजेसाठी अडचणी होत होत्या. यावर उपाय म्हणून पाच वर्षांपूर्वी सर्व सुवासिनी एकत्र येऊन वडाची लागवड करण्याचे ठरविले लागवड केलेल्या वडाचे संवर्धन देखील केले.आज पाहता पाहता अनेक वडाची झाडे परिसरात झाली असून हे पाहून मनाला खूप समाधान वाटते. मागील वर्षी10 वड लावले होते त्यांचे पूजन आज सुवासिनींनी केले. वृक्ष लागवडीसाठी दरवर्षी वृक्ष संवर्धन समितीच्या वतीने वडाची रोपे उपलब्ध करून दिली जातात.
रुपाली योगेश चौधरी
शिक्षिका





















