Homeताज्या बातम्याबँक कर्मचाऱ्याला मारहाणीचे उमटले तीव्र पडसाद ! जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शाखेचे कामकाज...

बँक कर्मचाऱ्याला मारहाणीचे उमटले तीव्र पडसाद ! जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शाखेचे कामकाज ठप्प

बँक कर्मचाऱ्याला मारहाणीचे उमटले तीव्र पडसाद ! जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत शाखेचे कामकाज ठप्प

शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-
स्टेट बँकेच्या प्रमोद नगर शाखेतील कर्मचाऱ्यावर उध्दवसेनेच्या कार्यकत्यांनी केलेल्या मारहाणीचे तीव्र पडसाद आज उमटले. जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत आरोपींवर कठोर कारवाईची मागणी करत बँकेचे कामकाज एक दिवसासाठी थांबविण्यात आले. शाखेच्या बाहेर कर्मचान्यांनी निदर्शने केली. दरम्यान, देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होताच तिधांना रात्रीच अटक करण्यात आली, दुपारुन त्यांना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
देवपुरात स्टेट बँकेची प्रमोद नगर शाखा आहे. या शाखेत सोमवारी उध्दव सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी येवून बँकेच्या कर्मचाऱ्यावर हल्ला केला. या घटनेत संबंधिताला धमकावणे, शिवीगाळ करणे, कार्यालयीन कामात अडथळा निर्माण करणे आणि मारहाण करण्यात आली. ही घटना अत्यंत निंदनीय असून या घटनेमुळे बँक कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. असुरक्षितता जाणवत असल्याचे कर्मचा-यांचे म्हणणे आहे.
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन स्टेट बँकेचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी एकत्र येवून जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची भेट घेतली. त्यांना निवेदन सादर करून हल्लेखोरांना अटक करुन
त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. ही घटना केवळ एखाद्या व्यक्तीपुरता मर्यादीत नसून बँकींग व्यवस्थेच्या सुरक्षिततेसाठी थो धोकादायक ठरू शकते. भारत सरकारच्या वित्त मंत्रालयाने ४ जून २०२५ रोजी जारी केलेल्या पत्रानुसार बैंक कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी कठोर आणि तातडीच्या उपाययोजना करणे आवश्यक असल्याची भावना कर्मचान्यांनी यावेळी व्यक्त केली. यावर पोलीस अधीक्षक धिवरे यांच्याशी बोलून योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
सादर केल्या विविध मागण्या जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात काही मागण्या करण्यात आल्या आहेत. त्यात या घटनेतील दोर्षीना तात्काळ
शोधून काढण्यात यावे. त्यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमाखाली कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशा घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी प्रमोद नगर शाखेसह इतर संवेदनशील शाखांमध्ये पोलीस बंदोबस्त आणि मस्त व्यवस्था करण्यात यावी. बैंक कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठी एक सुस्पष्ट आणि कार्यक्षम यंत्रणा उभारण्यात यावी. जिल्हा पातळीवर बँकींग सुरक्षेसाठी विशेष समन्वय समिती स्थापन करण्यात यावी अशा विविध मागण्यांचा यात समावेश करण्यात आला.
शाखेचे कामकाज थांबविले मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवित प्रमोद नगर शाखेचे कामकाज आज दिवसभरासाठी ठप्प होते. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शाखेच्या बाहेर एकत्र येवून
दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर सुध्दा निदर्शने करण्यात आली. एक दिवसासाठी प्रमोद नगर शाखेचे कामकाज थांबविल्यामुळे कोट्यावधीचा फटका व्यवस्थापनेला बसला आहे. तसेच जिल्ह्यातील स्टेट बँकेच्या सर्व शाखेने काल्सा फिती लावून या आंदोलनात सहभाग नोंदविला.
आंदोलनात यांचा समावेश एसबीआय ऑफिसर्स असोसिएशनचे अध्यक्ष सचिन गांगुर्डे, विनोद मराठे, ओम मराठे, लक्ष्मण पाटील, दिनेश कौशिक, शफीक पिंजारी, सदाशिव आजगे, पेन्शनर असोसिएशनचे एस. पी. शिंपी, राजेंद्र बघून चव्हाण यांच्यासह प्रमोद नगर शाखेचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासह सुमारे २०० ते जणांचा आंदोलनात सहभाग होता.

*उद्धवसेनेच्या जिल्हाप्रमुखांसह तिघांना अटक बँक कर्मचारी मारहाण प्रकरणी परस्परविरोधी गुन्हा*
स्टेट बँकेच्या प्रमोद नगर शाखेतील बँक कर्मचान्याला मारहाण केल्याप्रकरणी देवपूर पोलिसांत परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल होताच देवपूर पोलिसांनी उद्धवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे यांच्यासह उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी व महानगरप्रमुख धीरज पाटील या तिघांना अटक केली.
देवपुरातील प्रमोद नगर शाखेत सोमवारी दुपारी १ वाजेच्या सुमारास बँकेत कामकाज सुरु असताना उध्दवसेनेचे पदाधिकारी व व कार्यकर्ते दाखल झाले, त्यांनी बँक कर्मचारी सदाशिव नरहरी अजगे यांना मॅनेजर यांच्या कॅबिनमध्ये बोलावून घेतले. मराठी माणूस असून गुजराती लोकांची बाजू का घेतो असे बोलून उद्धवसेनेचे महानगरप्रमुख धिरज पाटील यांनी सदाशिव अजगे यांच्या कानशिलात लगावली. तसेच उपजिल्हाप्रमुख नरेंद्र परदेशी यांनी अजगे यांची मान पकडून पाय पडण्यास व माफी मागण्यास भाग पाडले. तर पद्मा किसन शिंदे या महिलेसह इतर लोकांनी दमदाटी करून शिवीगाळ केली. याप्रकरणी सदाशिव नरहरी अजगे (व्य ३३, रा. जानकी नगर, वाडीभोकर रोड, देवपूर धुळे) यांनी देवपूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. त्यानुसार नरेंद्र परदेशी, माजी जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे, धौरज पाटील, पदमा किसन शिंदे यांच्यासह १५ जणांविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३चे कलम १३२, १२१ (१), १८९ (२), १९१ (२), ३५२. ३५१ (२) (३), म.पो.का. क १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच रात्रीतून पोलिसांनी नरेंद्र परदेशी, अतुल सोनवणे,धीरज पाटील यांना अटक केली. दुपारी त्यांना न्यायालयात त्या हजर केले जाणार आहे.
दुसऱ्या गटाकडून शिक्षिका पद्मा किसन शिंदे (वय ४३. रा. गौकूळ अपार्टमेंट, देवपूर धुळे) या महिलेने फिर्याद दाखल केली. त्यानुसार, स्टेट बँकेच्या प्रमोद नगर शाखेत व्यवहार भाष करण्यासाठी गेले होते. बँकेत गोल्ड लोनचे पैसे उशिरा आले या कारणावरून बँकेचे व्यवस्थापक अतुल राजेंद्रकुमार गांधी राज आणि कर्मचारी सदाशिव अजगे यांनी अश्लिल शिवीगाळ हिंद करत अपमानास्पद वागणूक दिली. मराठी भाषेचा आणि २० प्रांताचा अपमान केला. या याप्रकरणी वरील दोघांविरोधात भारती न्याय संहिता २०२३ चे कलम ७९, ३५२, ३५१, (२), (३) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक लक्ष्मी करनकाळ करित आहे.

<

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780754078.1d412373 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780736031.1c5400c0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780717892.1b910fdf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780754078.1d412373 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780736031.1c5400c0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780717892.1b910fdf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link
error: Content is protected !!