शिंदखेडा तालुकास्तरीय शिक्षणाची वारी उत्साहात
शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
दोंडाईचा येथील हस्ती भवनला आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन व शिक्षणमहर्षी दादासाहेब रावळ यांच्या जयंती निमित्ताने शिंदखेडा तालुकास्तरीय शिक्षणाची वारीचे आयोजन करण्यात आले होते. या वारीचे उद्घाटन राज्याचे राजशिष्टाचार तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी २२ हस्ती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष कैलास जैन होते. यावेळी दोंडाईचात विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक विज्ञान लॅब निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी सांगितले.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गटविकास अधिकारी रमेश नेतनराव, शिक्षण विस्तार अधिकारी सी. एस. खर्डे, शैलजा देवकर, दोंडाईचा भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, रोटरी क्लबचे अध्यक्ष प्रवीण महाजन, नगरसेवक भरतरी ठाकूर, कृष्णा नगराळे, हितेंद्र महाले, जितेंद्र गिरासे, चंद्रकला सिसोदे, मनोज निकम उपस्थित होते.
वारीत लागले विविध शैक्षणिक स्टॉल
या शिक्षणाच्या वारीत १६ स्टॉल जिल्हा परिषद शाळांचे, ६ स्टॉल माध्यमिक विद्यालय व इंग्रजी माध्यमांच्या शाळांचे असे २२ शैक्षणिक स्टॉल लावण्यात आले होते. स्टॉल विद्यार्थी व शिक्षक यांना शैक्षणिक, अध्ययन अध्यापनासाठी उपयुक्त होते.पालकमंत्री जयकुमार रावल यांनी प्रत्येक स्टॉलला भेट देऊन स्टॉलची माहिती
जाणून घेतली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास जैन यांनी शिक्षणाच्या वारीचे महत्व आपल्या मनोगतात सांगितले. शिक्षणाची वारी यशस्वी करण्यासाठी जिल्हा परिषद, नगरपालिका शिक्षक यांनी प्रयत्न केले. दुसऱ्या दिवशी समारोप कार्यक्रमाप्रसंगी स्टॉलधारक शिक्षकांना ट्रॉफी व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. प्रास्ताविकात गटशिक्षणाधिकारी डी. एस. सोनवणे यांनी २०१४ ते २०१९ या कालावधीत शिक्षणाची वारी सुरु करण्यात आली होती. त्यानंतर बंद पडलेली शिक्षणाची वारी दोंडाईचा शहरात पुन्हा सुरू करण्यात आल्याचे सांगितले.






















