धुळे ते पुणे बसला रात्रीच्या वेळेस थांबा द्या किंवा नवीन बस सुरू करा याची मागणी…..
(खान्देश विकास प्रतिष्ठान राजगुरूनगर यांची मागणी….)
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
खानदेशातील धुळे,,जळगाव,, नंदुरबार,,नागरिक मोठ्या संख्येने नोकरी आणि व्यवसाय निमित्त,, राजगुरुनगर –पुणे –पिंपरी चिंचवड .भोसरी. चाकण या परिसरात मोठ्या संख्येने वास्तव्यास आहेत खानदेशी नागरिकांना गावी येण्या–जाण्या साठी रात्रीच्या १० वाजेची पुणे ते धुळे बस नॉन स्टॉप असल्यामुळे सदर सेवेचा लाभ चाकण व राजगुरुनगर परिसरातील खानदेशी लोकांना याचा फायदा होत नाही . तसेच सदर बस इतर ठिकाणावरून पकडता येत नाही तरी त्यामुळे रात्रीची बस सेवा असूनही सदर बस सेवेचा लाभ खानदेशी नागरिकांना होत नाही तरी सदर बसचे सर्व थांबे लवकरात लवकर सुरू करावेत किंवा नवीन बसची व्यवस्था करून द्यावी.. अन्यथा सदर त्या बसच्या अगोदर साधारण २०.४५ वाजता शिवाजीनगर येथून पुणे धुळे असे सर्व थांब्यावर थांबवावे किंवा राजगुरुनगर धुळे ही बस सेवा सुरू करावी जेणेकरून सर्व बस सेवेचा फायदा सर्व नागरिकांना चढउतार करण्यासाठी प्रवाशांना होईल… असे निवेदन.. अर्ज पत्र देऊन आज राजगुरुनगर येथील माननीय व्यवस्थापन राज्य परिवहन बस स्थानक तालुका खेड (पुणे) यांना समस्त राजगुरुनगर आणि समस्त खान्देश विकास प्रतिष्ठानच्या बांधवांच्या वतीने देण्यात आले..
व त्याचबरोबर डेपोतील अधिकाऱ्यांनी विश्वासाने आश्वासन दिले की बस १०० टक्के बस चालू होणार.. त्याप्रसंगी मोठ्या प्रमाणावर राजगुरुनगर कर व खानदेश कर बांधव उपस्थित होते






















