शिंदखेडा न्यायालयात 681 प्रकरणांचा निपटारा , तडजोडीतून 96 लाख 19 हजार 656 रुपयांची वसुली. ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
शिंदखेडा – महाराष्ट्र राज्य व जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या निर्देशानुसार तालुका विधी सेवा समिती शिंदखेडा न्यायालयात लोक न्यायालयाचे आयोजन दि. 13 सप्टेंबर रोजी करण्यात आले होते. या लोकन्यायालयात प्रकरणांचा निपटारा करण्यात आला. तर तडजोडीतून 96 लाख 19 हजार 656 रुपयांची वसुली करण्यात आली.
लोकन्यायलायचे उदघाट्न दिवाणी न्यायाधीश श्रीमती हर्षदा एस. आदमाने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शिंदखेडा बार असोशियशनचे वकील उपस्थित होते.
लोकन्यायालयाच्या पॅनलवर पोस्ट लिटिगेशन 570 खटले ठेवण्यात आले होते. त्यापैकी 20 खटले निकाली झाले. प्रिलिटिगेशनचे 5043 प्रकरणांपैकी 661 प्रकरणे निकाली झाले. असे एकूण 681 प्रकरणे निकाली काढण्यात आले. फौजदारी व दिवाणी प्रकरणा मधून एकूण रक्कम रुपये 736846/- वसूल झाली. बँकेचे प्रकरणां पैकी एकूण 7470000/- व पंचायत समितीकडील प्रकरणात एकूण 1412810 असे एकूण 96 लाख 19 हजार 656 रक्कम वसूल झाली. फौजदारी प्रकरणांपैकी 11 प्रकरणे गुन्हा कबुलीचे, कलम 138 चे 2 प्रकरण व 5 दिवाणी प्रकरणे, कौटुंबिक हिंसाचारचे 2 प्रकरणे, असे एकूण 20 प्रकरणे निकाली काढण्यात आली.
लोकन्यायालयाचे पॅनल सदस्य म्हणून विधिज्ञ श्री. बी. बी. आखाडे उपस्थित होते. न्यायालयीन सहाय्यक अधीक्षक प्रमोद ठाकूर, लघुलेखक राहुल माळी, न्यायालयाचे लिपिक सचिन ताडगे, जी. व्ही. माळी, एच टी साळी, आर पी कुंभार,
पवन फुलपगारे, एल. वाय. सोनवणे, देवेंद्र जोशी, मुकेश ठाकूर, पवन दुसाने यांनी परिश्रम घेतले.






















