हस्ती बँक शाखा शिंदखेडाच्या वर्धापन दिनानिमित्त दंतरोग चिकित्सा व रक्तदान शिबीर
शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दि हस्ती को. ऑफ बँक च्या शिंदखेडा शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त सोमवार दि. 15 सप्टेंबर रोजी दंतरोग चिकित्सा व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
संस्थापक अध्यक्ष स्व. हस्तीमलजी जैन यांची प्रेरणा घेऊन स्थापन झालेल्या हस्ती बँक तर्फे विविध उपक्रम राबविले जातात. स्व. कांतीलालजी जैन यांनी ३५ वर्षां पूर्वी बँकेची पहिली शाखा शिंदखेडा येथे स्थापन केली आज त्या शाखेच्या ३६ व्या वर्धापन दिन साजरा करण्यात येणार आहे, त्यानिमित्ताने जवाहर मेडिकल फाउंडेशन ए.सी.पी.एम. डेंटल कॉलेज धुळे व डिपार्टमेंट ऑफ पब्लिक हेल्थ डेंटिस्ट्री धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने गरीब व गरजू रुग्णांचे दंतरोग चिकित्सा तपासणी शिबीर तसेच रक्तदान शिबिरासाठी नवजीवन रक्तपेढीचे सहकार्य राहणार आहे. रक्तदान हे सामाजिक कर्तव्य आहे म्हणून जास्तीत जास्त लोकांनीं रक्तदान करावे तसेच गरजूनी दंतरोग चिकित्सा तपासणीचा लाभ घ्यावा असे आवाहन बँकेचे अध्यक्ष कैलास जैन, व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष मदन जैन, व्हा.चेअरमन डॉ. दिलीपकुमार चोरडिया, विद्यमान संचालक प्रा.जितेंद्र पाटील, हितेंद्र जैन मुख्य कार्यकारी अधिकारी सतिष जैन,शिंदखेडा शाखा समिती चेअरमन ऍड. अशोक गुजराथी, व्हा.चेअरमन अनिल वानखेडे , सर्व समिती सदस्य व शाखा व्यवस्थापक चंद्रशे शर्मा यांनी केले आहे.






















