Homeताज्या बातम्यापुणे–पिंपरी चिंचवड येथे लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी आलेल्या तरूणाची हत्या; (सांगवी पोलिसात...

पुणे–पिंपरी चिंचवड येथे लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी आलेल्या तरूणाची हत्या; (सांगवी पोलिसात ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ९ जणांना अटक..)

पुणे–पिंपरी चिंचवड येथे लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी आलेल्या तरूणाची हत्या;

(सांगवी पोलिसात ११ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल, ९ जणांना अटक..)

(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

(पुणे).पिंपरी चिंचवडमध्ये सांगवी तील पिंपळे गुरव येथे देवकर पार्क मधील एक धक्कादायक घटना समोर आली आहे. नात्यातील एका मुलीच्या २६ वर्षीय प्रियकराला ११ जणांनी केलेल्या बेदम मारहाणीत त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी सांगवी पोलिसांनी ११ आरोपींविरुद्ध कट रचून खुनाचा गुन्हा दाखल केला असून, आतापर्यंत ९ जणांना अटक करण्यात आली आहे.ही घटना २२ जुलै रोजी पिंपळे गुरव परिसरात असलेल्या देवकर पार्कमधील एका खोलीत घडली. मयत तरुणाचे नाव रामेश्वर घेंगट असून, त्याचे त्याच्याच नात्यातील एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. मात्र, रामेश्वरचा स्वभाव आणि त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून तरुणीच्या कुटुंबियांनी त्यांच्या लग्नाला विरोध केला होता.मात्र दोघेही लग्नावर ठाम असल्याने, तरुणीच्या कुटुंबियांनी रामेश्वरला लग्नाबद्दल बोलणी करण्यासाठी बोलावले. रामेश्वर त्याच्या आई-वडिलांसोबत त्यांच्या घरी गेला. तिथे दोन्ही कुटुंबांमध्ये वाद झाला आणि याच वादातून तरुणीचे वडील आणि इतरांनी रामेश्वरला एका खोलीत नेले. तिथे त्याच्या गुप्तांगावर, डोक्यात आणि शरीराच्या इतर भागांवर बेदम मारहाण केली. या मारहाणीत रामेश्वर गंभीर जखमी झाला. त्याला उपचारांसाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही त्याला वाचवता आले नाही.ही माहिती सांगवी पोलिसांना मिळाल्यानंतर, त्यांनी रामेश्वरच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. सांगवी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कोळी यांनी दिलेल्या माहितीनुसार, रामेश्वर घेंगटला मारहाण करून खून केल्याप्रकरणी ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर नऊ जणांना अटक करण्यात आली आहे.पोलिस इतर आरोपींचा सध्या शोध घेत आहेत. मुलाचा जीव मारहाणीत गेल्याने कुटुंबियांना मोठा धक्का बसल्याचे बघायला मिळत आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात...

शिंदखेड्यात अरुण देसले ची गांधीगिरी पार्ट- नऊ 👉रस्ता की खड्डा भरले आखाजीच्या दिवशी खड्ड्यात डेरगं 👉 शिंदखेडा सार्वजनिक बांधकाम खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष ✍️शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776571604.5ad283eb Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776553532.5a78450a Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776535290.5955085f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776517108.576897fd Source link

error: Content is protected !!