*पालक मंत्री ना.जयकुमारभाऊ रावल यांच्याकडे शिंदखेडा शहरातील विविध मागण्यांचे पत्र*. शिंदखेडा माझा यादवराव सावंत सावंत
मुंबई येथे सचिवालयात आज दि. 04/07/2025 रोजी महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशीष्टाचार मंत्री तथा धुळे जिल्हा पालक मंत्री ना. जयकुमारभाऊ रावल यांचा कडे शिंदखेडा शहरातील सीड फार्म चे गट नं. 1191व 1194 हे क्षेत्र नगरपंचायत साठी राखीव असून ती जागा व गट नं. 419 धान्य गोडाऊन ची जागा अश्या दोन्ही जागा नगरपंचायत कडे हस्तारित करण्यासाठी तसेच शिंदखेडा शहरात वारंवार होणाऱ्या विजेच्या समस्या कायम स्वरूपी दूर करण्यासाठी 5 MVA उपकेंद्र व उच्चदाब वाहिनी होण्यासाठी निवेदन दिले, तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग शिंदखेडा यांचा अंतर्गत असलेला भगवा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौक पर्यंत चा रस्ता लवकरात लवकर करण्यात यावा व शहरतील विविध ठिकाणी विकास कामांना 5 कोटी रु. निधी मिळावा अश्या आशयचे निवेदन देण्यात आले.
यावेळी शिंदखेडा नगरपंचायतीचे भाजपा गट नेते रावसाहेब यांच्या सोबत माजी नगरसेवक चेतन परमार व भाजपा धुळे जि. चिटणीस प्रविण माळी यांनी सचिवलयात मुंबई येथे विविध मागण्यांचे निवेदन दिले. पावसाळी अधिवेशन चालू असल्याने ना. जयकुमार भाऊ रावल यांनी तात्काळ बैठक लावू असे आश्वासन दिले व कार्यालयातील पुढील कार्यवाई साठी तात्काळ आदेश दिलेत.



















