लाचखोर अधिकाऱ्यास 23 जुनपर्यंत पोलिस कोठडी
शिंदखेडा (यादवराव सावंत संपादक )
प्रकल्पग्रस्ताचा दाखला देण्यासाठी दोन हजारांची लाच स्वीकारणाऱ्या तामथरे (ता. शिंदखेडा) येथील मंडळ अधिकारी छोटू पाटील याला शनिवारी (ता. २१) धुळे जिल्हा सत्र न्यायालयाने सोमवार (ता. २३) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तामथरे येथील महसूल मंडळ अधिकारी छोटू महादू पाटील (वय ५४) याला धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोंडले (ता. शिंदखेडा) येथील तक्रारदार यांच्याकडून दोन हजार रुपये लाच घेताना चिमठाणे येथून अटक करण्यात आले होते.



















