Homeक्राईमधुळ्यात व्याजाचा परतावा मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले*...

धुळ्यात व्याजाचा परतावा मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले* *जिल्हा समन्वयक शुभम देव यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई*. 

*धुळ्यात व्याजाचा परतावा मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजाराची लाच घेताना रंगेहात पकडले* *जिल्हा समन्वयक शुभम देव यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई*.     ✍️ *संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज पोर्टल*                                                              👉 *बातमी सुपरफास्ट*                                    👉 व्याजाचा परतावा मिळवून देण्याच्या मोबदल्यात पाच हजार रुपयांची लाच घेताना अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे समन्वयक शुभम भिका देव यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले.
तक्रारदार यांनी आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळ, मर्या. मुंबई यांच्याकडुन “वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेअंतर्गत” रोजगाराकामी जेसीबीसाठी कर्ज मिळणेकरीता पात्रता प्रमाणपत्र घेवुन इंडसइंड बँकेकडुन २४,९६,०००/- रुपये वैयक्तिक कर्ज घेवुन जेसीबी खरेदी केले होते.
सदर घेतलेल्या वैयक्तिक कर्जाच्या अठरा हप्त्यांची मुदतीत परतफेड करुन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या व्याजपरतावा योजनेअंतर्गत त्यांनी घेतलेल्या कर्जाची परतफेड केलेल्या व्याजाची रक्कम परत मिळणेकरीता त्यांनी दि.१४.०७.२०२५ रोजी महामंडळाच्या धुळे येथील कार्यालयात जावुन जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांची भेट घेतली असता त्यांनी कर्जाचा व्याज परतावा मिळणेकरीताची आवश्यक कागदपत्रे तक्रारदार यांचेकडुन जमा करुन घेवुन तकारदार यांचा व्याज परताव्याचा प्रस्ताव महामंडळाच्या मुंबई कार्यालयाकडे पाठविण्यासाठी तक्रारदार यांच्याकडे ५,०००/- रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम दिल्याशिवाय त्यांचा प्रस्ताव पाठविणार नाही असे तक्रारदार यांना सांगितल्याने तक्रारदार यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, धुळे कार्यालयात आज रोजी समक्ष येवुन तकार दिली होती.सदर तक्रारीची आज दि.१६.०७.२०२५ रोजी पंचासमक्ष पडताळणी केली असता जिल्हा समन्वयक शुभम भिका देव यांनी तक्रारदार यांच्याकडे ५,०००/-रुपये लाचेची मागणी करुन सदर लाचेची रक्कम त्यांनी धुळे शहरातील जुने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील रस्त्यावर स्वतः स्विकारतांना त्यांना रंगेहात पकडण्यात येवुन त्यांचे विरुध्द धुळे शहर पोलीस स्टेशन येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु आहे.
सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक श्री भारत तांगडे व अपर पोलीस अधीक्षक श्री माधव रेडडी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उप अधीक्षक सचिन साळुंखे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच पथकातील राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर यांनी केली असुन गुन्हयाचा पुढील तपास सुरु आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!