Homeताज्या बातम्याशिक्षण विस्तार अधिकारी दहा हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात       ...

शिक्षण विस्तार अधिकारी दहा हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात                        धुळे तालुक्यातील चांदे प्राथमिक शाळेतील प्रकार  ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज

शिक्षण विस्तार अधिकारी दहा हजारांची लाच स्विकारतांना एसीबीच्या जाळ्यात                        धुळे तालुक्यातील चांदे प्राथमिक शाळेतील प्रकार 
✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज
धुळे – जिल्हा परिषद शाळेत विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने प्रभारी मुख्याध्यापकाकडून दहा हजाराची लाच घेतांना शिक्षण विस्तार अधिकारी रोहिणी नांद्रे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही कारवाई धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने केली. धुळे तालुक्यातील चांदे येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकाकडे मुख्याध्यापक पदाचा तात्पुरता कार्यभार देण्यात आला आहे. दि. ७ ऑगस्ट २०२५ रोजी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी नांद्रे यांनी जिल्हा परिषदेच्या शाळेला भेट देवून पाहणी केली. त्या दिवशी विद्यार्थ्यांची संख्या कमी असल्याने याबाबत प्राथमिक शिक्षण
अधिकारी किरण कुवर यांच्याकडे प्रतिकुल अहवाल सादर न करण्याच्या मोबदल्यात व शाळेला समग्र शिक्षा योजने अंतर्गत मिळालेल्या अनुदानाच्या मोबदल्यात स्वतः करीता व शिक्षण अधिकारी श्रीमती कुवर यांच्याकरीता दहा हजार रुपये लाच देण्याची मुख्याध्यापकाकडे मागणी केली. याबाबत दि. ११ रोजी धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मुख्याध्यापकांनी तक्रार दिल्यानंतर आज सकाळी धुळे पंचायत समिती मधील शिक्षण विभागाच्या कार्यालयात सापळा लावण्यात आला. शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती रोहिणी दत्तात्रय नांद्रे यांनी स्वतः तक्रारदार मुख्याध्यापकाकडून दहा हजाराची लाच स्विकारली आणि त्याचवेळी त्यांना अॅटी करप्शनच्या पथकाने रंगेहाथ पकडले. याप्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. सदर कारवाई नाशिक लाचलुचत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलिस अधिक्षक भारत तांगडे, अपर पोलिस अधिक्षक माधव रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली धुळे विभागाचे उपअधिक्षक सचिन सांळुखे, पोलिस निरीक्षक यशवंत बोरसे, पो नि पद्मावती कलाल, तसेच राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, मकरंद पाटील, रामदास बारेला, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सुधीर मोरे, जगदीश बडगुजर, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780953563.272331b7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780935449.2631ca84 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780917406.2523ca85 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780899213.23f8c767 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780881132.236fd48d Source link

error: Content is protected !!