शिक्षक शिक्षकेतर सेवाकानअभावी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान जबाबदार कोण संस्थाध्यक्ष राजपूत यांचा सवाल
–=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=-=
शिंदखेडा (प्रतिनिधी) सध्या शासनाच्या दिरंगाई धोरणमुळे माध्यमिक शाळा शिक्षक शैक्षकेतर रिक्त पदामुळे ओस पडू लागल्या आहेत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचे मतं संस्थाध्यक्ष विजयसिंह राजपूत यासंह हजारो शिक्षण संस्थानपुढे निर्माण झाला आहे
एकंदरीत मराठी माध्यमाच्या शाळा शासन बंद पडण्याच्या मार्गांवर असून इंग्रजी शाळा मात्र संस्थाचालक त्यांच्या मर्जीप्रमाणे शिक्षक भरती करून आपले शैक्षणिक हेतू साध्य करीत आहे असाही आरोप राजपूत यांनी केली आहे
राजपूत यांच्या मनी राजपूत उर्फ ठांणसिंग जिभाऊ शिक्षण प्रसारक मंडळ अंतर्गत राम मनोहर लोहिया माध्यमिक विद्यालय वरपाडे सह पूज्य सनेगुरुजी माध्य विद्यालय चौगांव, आई साहेब सकूबा देवी माध्यमिक विद्यालय देवी या माध्यमिक शाळा आहेत या सर्व शाळांमध्ये बी ए बी एड जागा एकूण आठ तर बी एस सी बिड 4 जागा रिक्त असून शिक्षकेतर सेवक त्यात शिपाई क्लार्क अश्या जागा रिक्त आहेत वेळोवेळी या बाबतीत लेखी निवेदन व पत्रव्यवहार म शिक्षणाधिकारी जीप माध्यमिक धुळे यासंह शिक्षण उपसंचालक यांच्याकडे वेळोवेळी केला आहे
शासनाने एकतर शिक्षक भरती करायचे आदेश संस्थाचालकांना द्यावे तेही 31 जुलै 2025 पावेतो द्यावे किंवा अतिरिक्त शिक्षकांचे शिक्षकेतर सेवकांचे समायोजन करावे त्यासं पण आमची तयारी आहे पण विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी असेही संस्थाध्यक्ष विजयसिंह राजपूत यांनी केली आहे
आज वरील संस्थे प्रमाणे शिंदखेडा शहरासह तालुक्यातील माध्यमिक शाळांची आहे अगदी कनिष्ठ महाविद्यालयामध्ये पण विषय शिक्षक नसल्याने ऐन शिक्षणाच्या उंबरठ्यावर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचेही मोठे नुकसान होऊ पहात आहे शासनाने याही बाबतीत युद्धपातळीवर दखल घ्यावी अशी मागणी अनेक संस्थाचालकांनी केली आहे



















