Homeताज्या बातम्याशिंदखेडा शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या युवा नेतृत्व राहुल सोनवणे यांची संचालक पदी निवड...

शिंदखेडा शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या युवा नेतृत्व राहुल सोनवणे यांची संचालक पदी निवड सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव. 

शिंदखेडा शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या युवा नेतृत्व राहुल सोनवणे यांची संचालक पदी निवड सर्व स्तरावरून अभिनंदन व शुभेच्छांचा वर्षाव.              ✍️ शिंदखेडा (यादवराव सावंत) प्रतिनिधी :-        शिंदखेडा शेतकरी बोर्डिंग संस्था पदाधिकारीच्या झालेल्या बैठकीत काही पदावर नुतन निवड करित महत्व पुर्ण जबाबदारी सोपविण्यात आल्या आहेत. संस्थेच्या संचालक म्हणून आदर्श गाव चिलाणे येथील युवा नेतृत्व राहुल गोपाळराव सोनवणे यांना स्थान देवुन त्यांची निवड करण्यात आली असुन सर्वत्र स्तरावरून त्यांचे अभिनंदन व शुभेच्छा दिल्या जात आहेत. राहुल सोनवणे हे चिलाणे येथील रहिवाशी असलेले सध्या शिंदखेडा येथे कॉलनीत वास्तव्याला आहेत. ते नेहमीच गोरगरीब, सर्वसामान्याना सोबत घेवून चालणारे व्यक्तिमत्व आहे. कुणाच्याही सुखदुःखात सदैव तत्पर असतात. ते नेहमीच गणेशोत्सव, शिवजयंती, डॉ. बाबासाहेब आबेडकर जयंती उत्सव, कानबाई उत्सव, आदिवासी विश्व गौरव दिवस,विर एकलव्य जयंती आदि सह अनेक महापुरुषांच्या जयंती, पुण्यतिथी साजरी करून नवतरुणाना एकत्रित आणतात. शिंदखेडा येथे वास्तव्य असताना संपूर्ण कॉलनी परिसरात त्यांनी अनेक विधायक कार्य हाती घेऊन समाजसेवा करण्याचे व्रत हाती घेतले आहे. सर्वच सण उत्सवात हिरहिरीने सहभागी होवुन युवक युवतीना एकत्र आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न करताना दिसतात. चिलाणे गावाच्या विकासासाठी ही सदैव ते तत्पर असुन सर्व स्तरावर जातीभेद बाजूला ठेवुन सुखदुःखासह शासकीय कामावर लक्ष ठेवुन गोरगरीब, सर्वसामान्याच्या अडीअडचणी दुर करण्यासाठी अहोरात्र सेवेसाठी तयार असतात. त्यांच्या कडुन आजपर्यंत अनेक सर्वसामान्याची विधायक कामे झाली आहेत. कॉलनी परिसरातही त्यांचे नाव अग्रस्थानी घेतले जाते. प्रत्येकाच्या अडी अडचणीत ते तत्पर असतात शिवाय गरजवंताना आर्थिक लाभ देखील देवुन त्यांना सहकार्याची भावना ठेवुन मदत करतात. म्हणून आजही त्यांना गोरगरीबाचा कैवारी म्हटलं तर वावगं ठरणार नाही. हात दया साथ घ्या… म्हणून आदर्श गाव चिलाणे सह संपुर्ण कॉलनी परिसरात ते चांगलेच परिचित झाले आहेत. म्हणून अशा उमद्या व मनमिळाऊ नेतृत्वाला शिंदखेडा येथील शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या संचालक पदावर नेमणूक करून युवा नेतृत्वाला संधी दिली आहे त्या संधीचे सोने करतील. राहुल सोनवणे सांगतात की, संस्थेच्या विविध शाखेमध्ये असलेली मरगड दूर करण्यासाठी आम्ही सर्व संस्थेच्या पदाधिकारी व संचालक मंडळाच्या सहकार्याने नवसंजीवनी आणण्यासाठी पूर्वीच्या काळी असलेल्या शेतकरी बोर्डिंग संस्था एकमेव नावारूपाला असलेली ही संस्था शिंदखेडात नव्हे तर तालुक्यात एक नवीन रूप धारण करेल आणि शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, विद्यार्थीच्या उज्वल भविष्यासाठी नाविण्यता आणु असा आशावाद त्यांनी यावेळी व्यक्त केला. पुनः च त्यांच्या शेतकरी बोर्डिंग संस्थेच्या संचालक पदी निवड झाल्याबद्दल आदर्श गाव चिलाणे सह शिंदखेडा संपूर्ण कॉलनी परिसर, मित्र परिवार, नातलग हयांचे कडुन हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीसाठी शुभेच्छा….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780626871.17728a4e Source link

error: Content is protected !!