*शिंदखेडा पोलिसांची सुपरफास्ट कारवाई – वर्धमान कंपनीतील चोरटा रोकडसह जेरबंद*
शिंदखेडा ( यादवराव सावंत संपादक शिंदखेडा माझा )- शिंदखेडा येथील वर्धमान कौटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत दि 27, 28 जून च्या रात्री एका चोरट्यांने तब्बल ३ लाख ९१ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली होती. याप्रकरणी शिंदखेडा येथील मॅनेजर जितेंद्र संखलेचा यांनी फिर्याद दिली होती त्या नुसार पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध भारतीय न्यायसंहिता सन २०२३ च्या कलम ३५१ (४) आणि ३०५ प्रमाणे शिंदखेडा पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला.शिंदखेडा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी ठाणे अंमलदार यांना सोबत घेऊन तपास पथकाच्या साह्याने तांत्रिक विश्लेषण व गोपनीय माहितीच्या आधारे कौशल्यपूर्ण तपास करत सीसी टीव्ही फुटेज चेक केले असता गुन्ह्याचा उलगडा केला आहे.यासंदर्भात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड यांनी पत्र परिषद बोलवली होती.पत्र परिषदेस संबोधित करताना त्यांनी सांगितले की,वर्धमान कौटेक्स प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत तब्बल ३ लाख ९१ हजार ६०० रुपयांची रोकड लंपास करणारा चोरटा जेर बंद करण्यात आला आहे. त्या चोरट्यास पकडण्यासाठी सीसीटीव्ही फुटेजची मदत घेण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्या चोरट्याने चोरी करत असताना आपला चेहरा झाकून ठेवला होता त्याने वापरलेल्या चप्पल वरून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असून त्याने कपाटाचे शटर तोडून त्यातील सर्व रोख रक्कम चोरून नेली असल्याचे तपासात निष्पन्न झाले त्या नुसार त्याने सदर रक्कम कंपनीच्या एका झाडाजवळ पॉलिथिन मध्ये ठेऊन दिली होती ती त्याच्याकडून 03 लाख 91 हजार 600 रुपये रोकड जप्त केले असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले आहे.त्या आरोपीचे नाव गगन चंद्रप्रकाश शर्मा असून तो गाव चारभुजा तालुका मांडळगड जिल्हा भीलवाडा राजस्थान येथील राहणारा आहे. तो याच कंपनीत स्वयंपाकी म्हणून काम करत आहे या तपास पथकात पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड,पोलीस हेडकॉन्स्टेबल अशोक धनगर, गोपनीय शाखेचे हेड कॉन्स्टेबल अनंत पवार, हेड कॉन्स्टेबल गणेश सोनवणे, हेमराज जाधव, पोलीस कॉन्स्टेबल कैलास चौधरी, चेतन माळी, ऋषिकेश मोरे होते.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमान गायकवाड करीत आहेत.



















