शिंदखेडा तालुक्यातील वारुड राहुल भदाणे बेपत्ता होऊन एक वर्ष लोटला तपासात निष्काळजीपणा – धुळे पोलीस विभागाकडुन 51 हजाराचे माहिती देणाऱ्यास बक्षीस

शिंदखेडा ( यादवराव सावंत ) प्रतिनिधी :- तालुक्यातील वारुड राहुल देविदास भदाणे हा तरुण बारावीच्या क्लासला बेटावद येथे ११ जुनला सकाळी आठ वाजता घरुन निघाला होता. मात्र त्यानंतर संध्याकाळ पर्यत परतला नाही. इकडे तिकडे शोधाशोध केली असता तपास लागला नाही म्हणून नरडाणा पोलीस स्टेशन ला मिसिंग दाखल केली आहे. सुरुवातीला लोकेशन भुसावळ रेल्वे स्टेशन जवळ असल्याचे समजत होते.सी. सी. कॅमेरात देखील एका अनोळखी व्यक्तींसोबत जात असल्याचे दिसत आहे.सदरील फुटेज पेन ड्राईव्ह मध्ये स्टोअर करण्यात आलेला नाही.
कुंटुब सदस्य आई, वडील सह नातलगांना हुरहूर लागली आहे. चातकाप्रमाणे आपल्या मुलाची वाट पाहत
बसलेले आहेत. तब्बल एक वर्ष उलटुनही तपास लागत नसल्याने पोलीस यंत्रणेने अति जलद गतीने चक्र फिरवुन तपास लावावा. हरवलेल्या राहुल चा शोध नाही. सुरुवातीच्या कालावधीतच तपासात निष्काळजीपणा असुन सदर प्रकरणाच्या गांभीर्याकडे तपास अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षपाणामुळे कुटुंब हतबल आहे वास्तविक हायकोर्टानेही पोलीस अधिकाऱ्यांना तपासात सातत्य ठेवावे असा आदेश दिला आहे अल्पवयिनाच्या जिवीताचा प्रश्न निर्माण झाला असून तपास कार्य पोलीस यंत्रणेने जलद गतीने चक्रे फिरवून तपास करून सदर तरुणाचा शोध लावावा अशी मागणी कुंटुब नातलग व वारुड ग्रामस्थांनी केली आहे. धुळे पोलीस विभागाच्या वतीने सदर बेपत्ता तरुणाची माहिती वा आढळल्यास 51,000 हजाराचे बक्षीस ठेवले आहे.
राहुल हा सोळा (आता सतरा )वर्षाचा असुन, उंची ५ फूट ५ इंच असुन रंग सावळा, गहरा सफेद आहे. काळी पॅन्ट व काळा शर्ट अंगावर स्कूल बँग आहे. असे वर्णन असलेला तरुण कुणाला आढळल्यास वा सापडल्यास नरडाणा पोलीस स्टेशन (०२५६६-२९९२३५) सह नजिकच्या पोलीस स्टेशन ला संपर्क साधावा तसेच वडील देविदास (वकील) भदाणे यांच्या मो.- ९८६०२८१९७८, ९४०४०३६७५५ या नंबर वर संपर्क करावा.





















