Homeताज्या बातम्याशिंदखेडा तालुक्यातील आदिवासी वरील अन्याय अत्याचार पोलिसांकडुन कारवाईस दिरंगाई आदिवासी समाजाचा एल्गार...

शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी वरील अन्याय अत्याचार पोलिसांकडुन कारवाईस दिरंगाई आदिवासी समाजाचा एल्गार लवकरच नाशिक आय. जी. कार्यालयात मोर्चा धडकणार- दिपक अहिरे

शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी वरील अन्याय अत्याचार पोलिसांकडुन कारवाईस दिरंगाई आदिवासी समाजाचा एल्गार लवकरच नाशिक आय. जी. कार्यालयात मोर्चा धडकणार- दिपक अहिर

 

शिंदखेडा यादवराव सावंत प्रतिनिधी शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाजावर सातत्याने अश्लील शिवीगाळ, मारहाण, धमकी देणे, तुच्छ लेखणे असे अन्याय, अत्याचाराचे प्रमाण समाजात असलेल्या अशिक्षित अज्ञानपणाचा फायदा तालुक्यातील वरदहस्त असलेल्या गावगुंडाकडुन होत आहेत हयाचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना अशा गावगुंडांवर कोणत्याही प्रकारची तात्काळ पोलिसांकरवी कारवाई होत नसल्याने ती दांडगाई फोपावत आहे. घटना घडुनही संबधीत पोलीस स्टेशनला जावुनही तात्काळ गुन्हा नोंद होत नाही त्यास विलंब केला जातो तसेच अशा गेल्या वर्षभरापासून अनेक घटना व गुन्हे दाखल केले असूनही अद्याप पर्यंत अशा आरोपींना साधी अटक देखील झाली नाही म्हणून संपूर्ण शिंदखेडा तालुक्यातील आदिवासी समाज संतप्त झाला असून लवकरच संपुर्ण आदिवासी महिलांसह नाशिक येथील आय जी कडे मोर्चा धडकणार असल्याचे भिल समाज विकास मंचचे संस्थापक अध्यक्ष दीपक अहिरे यांनी अखेर एल्गार पुकारला आहे शिंदखेडा तालुक्यात अशा अनेक घटना घडल्या असून त्यात काही प्राथमिक स्वरूपात अशा 1) बाम्हणे येथील सौ. सुंदरबाई सुरेश भिल सरपंच यांच्यावरील घडलेला प्रकार संदर्भीय दि. 30/05/25 रोजी तक्रार वजा निवेदन शिरपूर पोलीस उपविभागीय अधिकारी, धुळे पोलीस अधिकारी यांना दिले होते. बाम्हणे गावालगत हॉटेल सुरू करण्याचे हेतूने शेड उभारण्याचे काम सुरू असून त्यातच आरोपी यांनी दांडगाईने अधिकृत ग्रामपंचायतची कुठल्याही प्रकारे नळ कनेक्शन साठी अर्ज वा परवानगी तसेच शुल्क न भरता दिनांक 27/ 5 /2025 रोजी दुपारी- बारा वाजेच्या सुमारास तापी नदीवरून गावाचे जल कुंभाला जोडणारी मुख्य पाईपलाईनची तोडफोड करुन त्या ठिकाणी स्वतःच्या हॉटेल व्यवसायासाठी कनेक्शन जोडले त्याबाबत ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांमार्फत माहिती मिळाल्यावर सरपंच सुंदरबाई भिल यांनी ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधून कनेक्शन बाबत विचारले असता आरोपीने कुठलेही परवानगी घेता कनेक्शन घेतल्याचे सांगितले त्यावेळी स्वतः सरपंच रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रत्यक्ष मुख्य पाईपलाईन तोडफोड झालेल्या ठिकाणी ग्रामपंचायत पाणीपुरवठा कर्मचारी गोकुळ पाटील व सरपंच पती सुरेश चंद्रा भिल वगैरे यांच्यासोबत जाऊन पाहणी केली असताना त्यावेळी दोघेही आरोपी हे त्यांच्यासोबत पाच ते सहा व इतर गावातील दोन व्यक्ती यांच्या सोबत असलेले जवळ आले व आम्हास अश्लील जातिवाचक शिवीगाळ करु लागले व धमकी देण्यात आली.हा प्रकार एक गावातील प्रशासन प्रमुख पदावरील व्यक्तींना असे प्रकार अशुभनीय व कायद्याच्या चौकटीत बसणारा नाही म्हणून संबंधित आरोपी राहुल नंदकुमार निकम, राहुल दिलीप पाटील यांच्या विरोधात ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे तब्बल वीस दिवसांनी गुन्हा दाखल केला. जवळपास दहा दिवस उलटूनही कोणत्याही प्रकारची कारवाई दिसून येत नाही तरी लवकरात लवकर चौकशी करून संबंधिताना तात्काळ अटक करण्यात यावी अशी आमची मागणी आहे शिंदखेडा तालुक्यात सातत्याने आदिवासी समाजावर अन्याय होत असून अनेक प्रकारचे लहान मोठे स्वरूपाचे आत्याचारबाबत मारहाण, जातीवाचक शिवीगाळ याबाबत घटना घडलेल्या आहेत तरी देखील आदिवासी समाजाची तक्रारीची दखल तालुक्यातील कोणत्याही पोलीस स्टेशन घेत नाही काही प्रमाणावर गुन्हा दाखल जरी झाले असतील तरी संबंधित आरोपींना अटक होत नाही. मोकाट फिरताना दिसतात. 2)विरदेल येथील आदिवासी समाजाची 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून खून करण्यात आला या घटनेस जवळपास दीड वर्ष झाला असला तरी संशयीत आरोपींना अद्याप पोलिसांकरवी अटक झालेली नाही 3)चिमठाणे ता.शिंदखेडा पेट्रोलपंपावर आदिवासी तरुण काम करीत असताना त्याच्यावरही गावगुंडानी हल्ला केला होता. तरीही त्या प्रकरणातील अद्याप आरोपी अटक नाही.तरीही कार्यवाही कडे दुर्लक्षित केले जाते.म्हणून येणाऱ्या आठ दिवसात बाम्हणे सह इतर गुन्ह्यातील संशयीत आरोपीना अटक करण्यात यावी अन्यथा नाशिक पोलीस महाउपनिरीक्षक परिक्षेत्र आय. जी यांच्या कार्यालयासमोर मी स्वतः सरपंच व कुटुंबासह, सर्व कार्यकर्ते समवेत तिव्र स्वरुपाचा मोर्चा काढणार.असे आपणास निदर्शनास आणून देत आहोत ह्यात होणाऱ्या प्रकारास प्रशासन जबाबदार राहील असे दिपक दथरथ अहिरे
संस्थापक अध्यक्ष भिल समाज विकास मंच शिंदखेडा ( महाराष्ट्र राज्य ) यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्राद्वारे कळविले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link
error: Content is protected !!