प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम पुरस्काराने सन्मानित
श्रीरामपूर (प्रतिनिधी) श्रीरामपूर येथील प्रा. अक्षय कमलाकर तेलोरे यांना ए. डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (सांगली) यांच्यावतीने दिला जाणारा राष्ट्रीय आदर्श लेखक पुरस्कार २०२५ ने सन्मानित करण्यात आले. पुणे येथील ग.दी. माडगूळकर नाट्यगृह येथे पार पडलेल्या भारतरत्न डॉ . ए. पी. जे. अब्दुल कलाम राष्ट्रीय समाजरत्न व जीवनगौरव पुरस्कार वितरण या कार्यक्रम प्रसंगी देशातील विविध क्षेत्रातील विविध मान्यवरांना राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
प्रा. अक्षय तेलोरे यांनी साहित्य आणि वर्तमान पत्र क्षेत्रातील दिलेल्या योगदानाबद्दल त्यांना ए . डी. फाउंडेशन महाराष्ट्र राज्य (सांगली) यांच्यावतीने राष्ट्रीय समाजरत्न व आदर्श लेखक पुरस्कार प्रदान करण्यात आला. अक्षय तेलोरे यांनी आजपर्यंत युवाध्येय, दै. लोकनामा, दै. राष्ट्रसह्याद्री यासोबतच इतर अनेक वृत्तपत्रांच्या माध्यमातून विविध विषयातील लेख प्रसिद्ध झाले असून त्यांचे “मोडके शब्द” हा काव्य संग्रह तर “निखळ” हा कथा संग्रह अशी दोन पुस्तके प्रकाशित झाली आहेत. मागील वर्षी नवरात्रोत्सवात प्रा. अक्षय तेलोरे यांच्या दै. युवाध्येय व दै. लोकनामा या वृत्तपत्रांत प्रकाशित झालेली “उत्सव नवरात्रीचा जागर स्त्रीशक्तीचा” ही लेखमालिका वाचकांच्या विशेष पसंतीची ठरली होती. तसेच प्रा. अक्षय तेलोरे यांनी सुरू केलेल्या “पुस्तकांवर बोलू काही” या लेखमालिकेलाही वाचकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. प्रा. तेलोरे यांच्या याच लेखन कामाची दखल घेत ए. डी. फाउंडेशनच्या वतीने राष्ट्रीय पुरस्कारासाठी त्यांची निवड केली गेली. या पूर्वीही प्रा. तेलोरे यांना राज्यस्तरीय, आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करते आले आहे.
या पुरस्कार वितरण सोहळ्या प्रसंगी, महानगर पालिकेच्या सहायक आयुक्त वैशाली चव्हाण, सहायक पोलीस आयुक्त पुणे, राम मांडुरके, तनिषा फाउंडेशनचे अनिल जाहीर, ए डी फाउंडेशनचे अध्यक्ष अशोक गोरड आदी मान्यवर तसेच मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते.








