पुणे–पिंपळे गुरव येथे झाड कोसळले; कारचे मोठे नुकसान;
(जीवितहानी टळली;शहरातील जुनी व जीर्ण झाडांचे ऑडिट करण्याची मागणी)
(पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)
पुणे–पिंपळे गुरव, परिसरातील काटेपुरम चौकात आज दुपारी वडाचे झाड कोसळून स्विफ्ट डिझायर (क्रमांक MH 12 MN 9068) कारवर आदळले. या घटनेत कारचे मोठे नुकसान झाले असून सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
झाड कोसळल्याने परिसरात काही काळ मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली. स्थानिक नागरिकांनी तत्परतेने वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रयत्न केले आणि रस्ता मोकळा केला.
घटनेनंतर नागरिकांनी पिंपरी चिंचवड महापालिकेकडे झाडांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर चिंता व्यक्त केली आहे. शहरातील जुनी व जीर्ण झाडे तातडीने हटवावीत, त्यांचे ऑडिट करून योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात आली आहे. घटनास्थळी धाव घेऊन झाड हटविण्याचे काम केले. अग्निशामक केंद्राच्या जवानांनी
सुमारे तासाभरानंतर वाहतूक सुरळीत करण्यात आली. यावेळी सांगवी वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विशाल गजरमल, सांगवी पोलिस ठाण्याचे पोलिस हवालदार प्रकाश शिंदे, सचिन कामले, वाहतूक विभाग राजाराम काकडे पोलिस उपनिरीक्षक, परिसरातील आमदार शंकर जगताप यांचे स्वीय सहाय्यक गिरीश कांबळे, सामाजिक कार्यकर्ते संजय मराठे, सुरेश सकट, सखाराम रेडेकर यांनी झाड हटविण्यात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात मदत केली.









