नरडाणा येथील सिसोदे महाविद्यालयात परीक्षेसंदर्भात चर्चासत्र संपन्न. ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
– कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या परीक्षा व मुल्यमापन मंडळ आणि नरडाणा येथील ग्रामिण विकास शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कै. भाऊसाहेब एम. डी. सिसोदे कला वाणिज्य व डॉ.यू.पी. तनपूरे विज्ञान महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यापीठाच्या माहे ऑक्टो/ नोव्हे/डिसेबर 2025 च्या परीक्षेसंदर्भात चर्चासत्र आयोजित करण्यात आले. यावेळी प्रा. डॉ. गजानन पाटील, अधिसभा सदस्य, कबचौउमवि, जळगाव यांनी कॉपीमुक्त व तणावमुक्त परीक्षा संपन्न होण्यासाठी विद्यार्थ्यांनी नियमित महाविद्यालयात येणे, परीक्षा काळात वेळेचे पालन करणे व नियोजबध्द अभ्यास करणे गरजेचे असून विद्यापिठाचे निकाल वेळेवर लागण्यासाठी परीक्षा कालावधीत विद्यार्थ्यांच्या अडचणी सोडविणे, अंतर्गत / बहिस्थ पर्यवेक्षक, परीक्षकाने पेपर तपासणी तसेच परीक्षेचे कामकाज करतांना कोणती काळजी घ्यावी यासंदर्भात मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. पी.एस. गिरासे यांनी भूषविले. यावेळी उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील, उपप्राचार्य डॉ. एन. के. पाटील, प्राध्यापक व मोठ्या संख्येत विद्यार्थी-विद्यार्थीनी चर्चासत्रात सहभागी झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपप्राचार्य डॉ. यू. जी. पाटील यांनी केले तर प्रा.डॉ.पी.जी. सोनवणे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा. डॉ. राहुल भदाणे, प्रा. गिरीष पवार, प्रा. राहूल जाधव, प्रा. योगेश्वरी सावंत, प्रा. हर्षा पाटील, प्रा. रोहिणी सिसोदे, श्री. आर.ओ.पाटील, श्री. दिनेश बोरसे, श्री. संदीप निकम, प्रशांत सिसोदे, संजय बोरसे व शैलेंद्र सिसोदे यांनी परीश्रम घेतले.















