- शिंदखेडा साठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण… उधना ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस आज पासून सुरू. 👉शिंदखेडा ला थांबा रेल्वे प्रवासी संघर्ष समिती पदाधिकारी व भाजपच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांनी दाखवला हिरवा झेंडा. ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज (संपादक यादवराव सावंत ).
👉 शिंदखेडा साठी ऐतिहासिक असा सोनेरी क्षण होता…आजपासून उधना ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेस सुरू झाली असुन शिंदखेडा ला थांबा मिळाल्याने रेल्वे प्रवासी संघर्ष समिती चे तालुका अध्यक्ष दादा मराठे यांच्या नेतृत्वात भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह अधिकाऱ्यांनी हिरवा झेंडा दाखवत स्वागत केले.सदर गाडी उधना येथून शुभारंभ सकाळी अकरा वाजता देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाइन तर उधना येथे केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला त्यानंतर सदर गाडी मार्गस्थ होवुन बारडोली, व्यारा, नवापूर, नंदुरबार दोंडाईचा व शिंदखेडा या ठिकाणी येऊन थांबली सदर गाडीला शिंदखेडा तालुका रेल्वे संघर्ष समिती तालुका अध्यक्ष दादा मराठे यांच्या नेतृत्वात भाजप पदाधिकारी व रेल्वेचे अधिकारी अमित साहू व राजेंद्र पोहाणे,राहुल मराठे यांनी हिरवा झेंडा दाखवत उधना ब्रह्मपुरी अमृत भारत एक्सप्रेसचे स्वागत केले. हया चिमुकल्या मुलां मुलींनी तिरंगा झेंडा हातात घेऊन हवेत फिरवला.सदर जलद रेल्वे गाडी सुरू झाल्याने शिंदखेडा शहर व परिसरातील प्रवाशांमध्ये उत्साह दिसून आला यावेळी उधनाहून सदर गाडी प्रवास करीत असलेले गोरख माळी सह अनेक प्रवाशांनी रेल्वे बाबत विचारले असता रेल्वे ही आधीच्या रेल्वे पेक्षा अत्याधुनिक टेक्नॉलॉजीने सर्व सुख सुविधा युक्त असल्याचे सांगितले. आज शुभारंभ प्रसंगी उधधा ते ब्रह्मपुरी पर्यंत रेल्वे प्रवास मोफत करण्यात आला होता तसेच प्रवाशांना उत्कृष्ट प्रतीचे भोजन देखील प्रवासात देण्यात येत आहे.दिव्यांग साठी सुसज्य व्यवस्था यामुळे प्रवाशामध्ये उत्साहाचे वातावरण होते सदर रेल्वे नियमित सुरू करावी अशीही प्रवाशांनी रेल्वे अधिकाऱ्यांकडे मागणी केली. एकंदरीतच हयापुर्वी सदर गाडीला शिंदखेडा रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा यासाठी रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादा मराठे यांनी रेल्वेमंत्री माननीय अश्विनी वैष्णव व महाराष्ट्र राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री माननीय जयकुमार रावल यांच्या पाठपुराव्यामुळे सदरचा थांबा मिळाला असल्याने तसेच गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे सह रेल्वे प्रवासी संघर्ष समितीचे दादा मराठे सह भाजपा पदाधिकारी तसेच शिंदखेडा शहर व परिसरातील नागरिक प्रवाशांनी विशेष आभार व्यक्त केले. यावेळी रेल्वे प्रवासी संघटनेचे तालुका अध्यक्ष दादा मराठे, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश देसले, उल्हास देशमुख, भिला पाटील,माजी नगरसेवक चेतन परमार, एडव्होकेट विनोद पाटील, दिपक चौधरी,रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे धुळे जिल्हा उपाध्यक्ष संजय पाटोळे, माजी पंचायत समिती सदस्य सुभाष माळी, प्रकाश चौधरी, विकासोसायटीचे माजी चेअरमन रमेश भामरे,कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक पी. एल. पवार, राहुल महिरे,वृक्ष संवर्धन समितीचे योगेश चौधरी,राजेंद्र मराठे, जिवन देशमुख,पुरुषोत्तम गोसावी,बाळासाहेब गिरासे, राहुल मराठे, मंगलसिग मराठे, लताबाई मराठे,आदिसह भाजपा पदाधिकारीसह शहर व परिसरातील प्रवाशी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी छोटेखानी सत्कार समारंभ आयोजित केला होता. त्यात रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष दादा मराठे सह रेल्वे अधिकारी अमित साहू / ए डी ई ई / टी आर डी / एन डी बी,
राजेंद्र पोहाणे
/ इस एस / एस एम / एस एन के, आदी सह भाजपा शहर पदाधिकारी यांचा सत्कार करण्यात आला.हयावेळी रेल्वे पोलीस कर्मचारी सह शिंदखेडा पोलीस स्टेशन गोपणीय विभाग अनत पवार सह पोलीस कर्मचारी उपस्थित होते.सुत्रसंचलन बुकिंग मास्टर निकिता मराठे यांनी केले. शिंदखेडा ते पुणे रेल्वे सेवा देखील लवकरच सुरु करावी अशी मागणी रेल्वे संघर्ष समितीचे तालुका अध्यक्ष दादा मराठे सह पदाधिकारी यांनी रेल्वे प्रशासन अधिकारी कडे यावेळी करण्यात आली.















