Homeताज्या बातम्यापुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,,

✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

(पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर येथे उत्साहात शुभारंभ करण्यात आला. खानदेशातील प्रवाशांची अनेक वर्षांची प्रलंबित मागणी पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांनी या सेवेचे जल्लोषात स्वागत केले.
पुणे, पिंपरी-चिंचवड, भोसरी, चाकण आणि राजगुरुनगर परिसरात खानदेशातील मोठ्या प्रमाणावर नागरिक वास्तव्यास आहेत. सण, सुट्ट्या किंवा गावाकडे जाण्याच्या वेळी बसची अपुरी उपलब्धता आणि तिकिटां साठी होणारी धावपळ लक्षात घेता थेट बस सेवेची मागणी सातत्याने होत होती. अखेर राज्य परिवहन महामंडळाने याची दखल घेत ही सेवा सुरू केली. ही बस सेवा छत्रपती शिवाजीनगर (पुणे) येथून
राजगुरुनगर बसस्थानक
सकाळी ८.३० वाजता सुटते, तर राजगुरुनगर येथून सकाळी ९.३० वाजता पुढे धुळ्याकडे रवाना होते. सेवेच्या पहिल्याच दिवशी प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळाला असून सुमारे दहा हजार रुपयांपेक्षा अधिक तिकिटांची विक्री झाली.
राजगुरुनगर खानदेश विकास प्रतिष्ठान तसेच शशिकांत खलाणे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे ही बस सेवा सुरू होऊ शकली. लवकरच या मार्गावर ‘शिवाई’ बस सेवा देखील सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
शुभारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बस चालक अविनाश आलट आणि वाहक विकास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. तसेच राजगुरुनगर आगार प्रमुख उज्वला टाकळकर यांचा सन्मानही करण्यात आला. या वेळी विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नव्या बस सेवेच्या सुरूवातीमुळे पुणे-धुळे मार्गावरील प्रवास अधिक सुलभ होणार असून, विशेषतः खानदेशातील प्रवाशांसाठी ही सेवा मोठा दिलासा ठरणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776698202.623c21d4 Source link

error: Content is protected !!