*गुरु बाळचंद्रसिग महाराज यांच्या स्मुतीच्या गुरुपौर्णिमेच्या दिवशी होतोय भरगच्छ कार्यक्रमाद्वारा उजाळा* *शिंदखेडा येथील स्टेशन रोड रोड समाधीस्थळी विविध कार्यक्रमाचे आयोजन*. शिंदखेडा माझा न्युज(यादवराव सावंत ) :-. शिंदखेडा येथील सुप्रसिद्ध भजनकार व अध्यात्मिक प्रवचनातुन प्रचार प्रसार करणारे गुरु बाळचंद्रसिग गुमाणसिग फुले उर्फ बाळचंद्र महाराज हयांचे कार्याची आठवण म्हणून खान्देशातील शिष्य व हजारो भक्त गण गुरुपौर्णिमेच्या दिवसाच्या पर्वावर दोन दिवस भरगच्छ कार्यक्रम घेऊन आठवणीना उजाळा दरवर्षी दिला जातो. शिंदखेडा येथील त्यांचे सुपुत्र ताराचंद चंद्रसिग फुले व नातू दिपक फुले या फुले परिवाराने शंभर वर्षापासून ची चालत आलेली परंपरा बाळचंद्रसिग महाराज हयांच्या 1984 च्या मृत्यूनंतरही आजतागायत चालू ठेवली आहे. पहिले गुरु तिरसिग वळवी हाळसी नंदुरबार येथील होते. त्यांचे बाळचंद्र महाराज शिंदखेडा, गणपत वळवी, दुल्लभ बाबा, पिरुबाबा हे प्रमुख शिष्य होते. शिंदखेडा येथील बाळचंद्र फुले महाराजांनी आपल्या आध्यात्मिक भजनी माध्यमातून प्रचार प्रसार गेल्या अनेक वर्षापासून करत असल्याचे फुले परिवाराने सांगितले. दर गुरुपौर्णिमेच्या पावन पर्वावर भजनातुन रात्र जागरण व सकाळी शिंदखेडा शहरातुन भव्य पालखी मिरवणूक भजनाच्या निघून समाधी स्थळी महाप्रसाद वाटप केला गेला. हयावर्षी तब्बल तीनशे किलोचा मसालेभात वाटप करण्यात आला. हया मोहक गुरुपौर्णिमेच्या दिवशी शिंदखेडा सह नंदुरबार, शहादा, चोपडा, जळगाव, धुळे जिल्ह्यातुन हजारोच्या संख्येने भाविक उपस्थित होते. भजनी मंडळाचे प्रमुख नंदुरबार जिल्ह्यातील धुली येथील धर्मा आनंदा ठाकरे, निझरचे प्रताप महाराज, दयाराम महाराज,साजन महाराज,पथराईचे प्रवीण महाराज, ज्ञानेश्वर महाराज, साजन महाराज, चोपड्याचे नाना महाराज, पिगानाचे कैलास महाराज, बापु महाराज कलसाळी, बंसी महाराज सावलदा, रामेश्वर महाराज नटावद, दथरथ महाराज मळोदा,गोरख महाराज हरसोली, लालसिग महाराज फुलसरी, जगन महाराज आडवानी, धनस्या महाराज अडथी, सुपडया पाडवी मोड येथील प्रमुखांनी हजेरी लावली होती. सदर गुरुपौर्णिमेचा मोठ्या भक्तीमय वातावरणात साजरा झाला. हयासाठी शिंदखेडा येथील फुले परिवार सह शहरातील भक्त भाविकांनी परिश्रम घेतले.



















