महाराष्ट्र गोवा वकील बार कौन्सिलचे अध्यक्ष अँडव्होकेट श्री अमोल सावंत यांचा शिंदखेडा येथील जनता हायस्कूल तर्फे सन्मान

✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज ( संपादक यादवराव सावंत )
विद्यार्थ्यांनी जीवनात स्वयंशिस्त व सामाजिक बांधिलकी जपावी. अँडव्होकेट श्री अमोल सावंत. शिंदखेडा येथील जनता हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात महाराष्ट्र व गोवा राज्य बार कौन्सिल अध्यक्ष पदी निवडून आलेले शिंदखेडा ही जन्मभूमी असलेले अँडव्होकेट श्री अमोल सावंत यांचा संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांच्या शुभहस्ते यथोचित सत्कार व सन्मान करण्यात आला. याप्रसंगी महाराष्ट्र बार कौन्सिलचे अँडव्होकेट श्री सुरेश बच्छाव, अँडव्होकेट श्री ज्ञानेश्वर देवरे, अँडव्होकेट श्री मनीष भामरे संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील प्राचार्य श्री एस एस पाटील पर्यवेक्षक श्री बी जे पाटील ज्येष्ठ शिक्षक श्री एस के जाधव श्री डी एच सोनवणे वरिष्ठ लिपिक श्री किशोर गोरख पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी अँडव्होकेट अमोल सावंत यांनी शिंदखेडा शहरात गेलेले त्यांचे बालपण व शालेय जीवन याबाबतीत विद्यार्थ्यांशी हितगुज केली. जीवनात विद्यार्थ्यांच्या अंगी स्वयंशिस्त व सामाजिक बांधिलकी असेल तर असा व्यक्ती जीवनाच्या सर्वोच्च पदापर्यंत जाऊ शकतो असे मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. तसेच जनता हायस्कूल शिंदखेडा पंचक्रोशीत नामांकित शाळा असून चांगले शैक्षणिक वातावरण निर्माण करत आहे आणि यात संस्था अध्यक्ष श्री मनोहर गोरख पाटील यांचे मोलाचे योगदान आहे असेही मत त्यांनी याप्रसंगी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री एस ए पाटील यांनी तर मान्यवरांचे आभार श्री एस के जाधव यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी बंधू-भगिनी यांची मोलाचे सहकार्य लाभले.















