पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना राष्ट्रपती पदक मिळाल्याबद्दल गावकऱ्यांच्या वतीने जाहीर सत्कार गुणवत्तापूर्व सेवेसाठी मिळाला पुरस्कार; राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते झाला होता सन्मान
👉 शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावाच्या शिरपेचात मानाचा तुरा

✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत ):
राज्याची कायदा आणि सुव्यवस्थेची जबाबदारी पोलीस यंत्रणांच्या समर्थ खांद्यावर असते कोणत्याही समाजाची प्रगती तेव्हाच होत असते जेव्हा त्यांच्या प्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था सुरळीत असते. पोलीस दलात उत्तम काम करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना त्यांच्या गुणवत्तापूर्व सेवेसाठी त्यांचा गौरव केला जातो. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे कार्यरत पोलीस निरीक्षक रामकृष्ण नारायण पवार यांना त्यांच्या गुणवत्तापूर्व सेवेसाठी राष्ट्रपती पोलीस पदकाने गौरविण्यात आले आहे. ही बाब पाटणकरांसाठी अभिमानाची बाब आहे.
मुंबई येथील राजभवनात राष्ट्रपती पदक अलंकारण सोहळा पार पडला. राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते ठाणेदार रामकृष्ण पवार यांना राष्ट्रपती पदक देऊन नुकतेच सन्मानित करण्यात आले. हा सन्मान पोलीस दलातील शिस्त, प्रामाणिकपणा आणि जनतेच्या सुरक्षेसाठी केलेल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांची दखल घेऊन प्रदान करण्यात येतो. तर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार यांना राष्ट्रपती पदक जाहीर झाल्याबद्दल सन्मानित करण्यात आले. यामुळे शिंदखेडा तालुक्यातील पाटण गावाच्या शिरपेच्यात मानाचा तुरा रोवला गेला आहे, गावातील विविध सामाजिक, राजकीय, विविध समाजघटकातील लोक उपस्थित होते, गावातील तरुणांना रामकृष्ण पवार यांचे यश हे नेहमीच प्रेरणादायी राहील असा आशावाद व्यक्त करण्यात आला, “सद्रक्षणाय खलनिग्रहणाय” हे महाराष्ट्र पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे. याचा अर्थ असा की, महाराष्ट्र पोलीस सज्जनांचे रक्षण करण्यास आणि दुर्जनांवर नियंत्रण ठेवून त्यांचा नायनाट करण्यास कटीबद्ध आहेत. नागरिकांच्या संरक्षणासाठी पोलीस दादा ऊन, वारा, पाऊस असे कोणतेही संकट आले तरी न डगमगता खंबीरपणे उभे राहतात. वर्षभर येणारे सण उत्सव धार्मिक कार्यक्रम मिरवणुका यासाठी रस्त्यावर नेहमीच तैनात पोलीस दादा दिसतो. खामगाव शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक म्हणून रामकृष्ण पवार हे २६ ऑगस्ट २०२४ रोजी रुजू झाले. त्यांनी त्यांच्या सेवेत विविध संवेदनशील प्रकरणांची यशस्वी उकल केली आहे. गुन्हेगारीवर प्रभावी नियंत्रण, समाजातील उपेक्षित घटकांच्या सुरक्षेसाठी केलेले प्रयत्न, तसेच नागरिकांमध्ये पोलीस दलाविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी केलेल्या उपक्रमांमुळे ते ओळखले जातात. त्यांच्या नेतृत्वाखाली खामगाव शहर पोलीस स्टेशनने अनेक गुन्ह्यांचा तपास वेगाने
पूर्ण केला असून, कायदा व सुव्यवस्था राखण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ठाणेदार रामकृष्ण पवार त्यांच्या दमदार कामगिरीमुळे पाटण गावाची मान उंचावली असून गाववासीयांसाठी अभिमानाची बाब आहे. खामगाव शहर पोलीस स्टेशनला गतवर्षी रुजू झालेले ठाणेदार रामकृष्ण पवार यांनी वर्षभरात खामगाव शहरात आपल्या कामकाजाचा ठसा उमटविला आहे.
गरीब असो की श्रीमंत सर्वांना समान न्याय देण्याचा प्रयत्न त्यांनी चालविला आहे. त्यामुळे आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आपल्याला पोलिसांकडून न्याय मिळेल या भावनेने सामान्य नागरिक पोलीस स्टेशनमध्ये येतात. नागरिकांना न्याय देण्याचा नेहमीच ठाणेदार रामकृष्ण पवार यांचा प्रयत्न राहिला असल्याने खामगाव शहरात आपला माणूस म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली आहे















