विरदेल येथील श्रीमंत गो सं देवकर विद्यालयाचा शिरपेचात मानाचा तुरा. 👉मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा पुरस्कार
✍️ शिंदखेडा माझा( संपादक यादवराव सावंत) :-
मुख्यमंत्री माझी शाळा-सुंदर शाळा पुरस्कार सोहळा हिरे मंगल कार्यालय धुळे येथे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला यात श्रीमंत गो.सं.देवकर माध्यमिक विद्यालय विरदेल यांना धुळे जिल्हा खासदार सौ शोभाताई बच्छाव, धुळे ग्रामीण आमदार श्री राघवेंद्र भदाणे, माध्य. शिक्षणाधिकारी श्री मनीष पवार,योजना शिक्षणाधिकारी सौ पुष्पलता पाटील, माजी जि. प.अध्यक्षा सौ धरतीताई देवरे, धुळे डायटचे ज्येष्ठ अधिव्याख्याता आबासाहेब श्री जे एस पाटील तसेच शिंदखेडा पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी श्री डी एस सोनवणे व विस्तार अधिकारी श्री संतोष चौधरी, केंद्रप्रमुख श्री गुलाब सोनवणे यांच्या उपस्थितीत विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री जे एस पाटील व विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री एस एस गोसावी व शिक्षक श्री सुनील चौधरी तसेच विद्यालयाचे वरिष्ठ लिपिक श्री योगेश जगताप यांना प्रदान करण्यात आला यानिमित्ताने विद्यालयातील सर्व शिक्षकांचे तसेच शिक्षकेतर कर्मचारी बंधू भगिनींचे संस्थाध्यक्ष नानासाहेब श्री एस बी देवकर, संस्थेचे सचिव श्री भरतजी देवकर व सर्व ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले व विद्यालयाच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या















