Homeताज्या बातम्याविरदेल येथील देवकर विद्यालयात स्नेह, सन्मान व संस्कारांचा अविस्मरणीय “अभिनव रक्षाबंधन” सोहळा ...

विरदेल येथील देवकर विद्यालयात स्नेह, सन्मान व संस्कारांचा अविस्मरणीय “अभिनव रक्षाबंधन” सोहळा                                                                ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज

विरदेल येथील देवकर विद्यालयात स्नेह, सन्मान व संस्कारांचा अविस्मरणीय “अभिनव रक्षाबंधन” सोहळा                                                                ✍️ संपादक यादवराव सावंत शिंदखेडा माझा न्युज

शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा पुरस्काराने सन्मानित आणि परिसरातील ख्यातनाम शिक्षणसंस्था श्रीमंत गोविंदराव संपतराव देवकर विद्यालय येथे यंदाचा रक्षाबंधन सण एक वेगळाच, मनाला भावणारा आणि संस्कारांना अधोरेखित करणारा ठरला.                     विद्यालयातील ज्या भावांना बहीण नाही किंवा ज्या बहिणींना भाऊ नाही अशा विद्यार्थ्यांचा शोध घेऊन, एकत्र आणून, त्या बहिणींनी निवडलेल्या भावांचे औक्षण करून प्रेमाने राख्या बांधल्या. या वेळी भावांनीही मन:पूर्वक चरणस्पर्श करून बहिणींना वंदन केले आणि आयुष्यभर संरक्षण व जिव्हाळ्याचे नाते टिकवण्याची गोड शपथ घेतली.                  याचबरोबर विद्यालयातील प्रत्येक वर्गातील सर्व बहिणींनी त्या त्या वर्गातील सर्व भावांना सामूहिक राख्या बांधण्याचा अत्यंत भावनिक हृदयस्पर्शी सोहळा संपन्न झाला . भाऊ-बहिणींच्या नात्यातील स्नेह, एकोप्याची भावना आणि पारंपरिक सणाची खरी उब या उपक्रमातून अनुभवायला मिळाली.   फक्त मानवी नात्यापुरतेच नव्हे तर पर्यावरणपूरक संदेश देण्यासाठी विद्यालयातील सर्व गाईड विद्यार्थीनी व गाईड कॅप्टन सौ . जे. ए. निकवाडे, सौ.पी.जी.शिंदे यांनी विद्यालयातील प्रत्येक वृक्षाला प्रेमाची राखी बांधून “निसर्ग आपला जिवलग भाऊ” हा संदेश जिवंत केला. निसर्गसंवर्धनाच्या भावनेला दिलेले हे बंधन सर्वांसाठी प्रेरणादायी ठरले. कार्यक्रमाचे संयोजन तथा सूत्रसंचालन सौ. जे. ए.नीकवाडे, व पी. जी. शिंदे यांनी केले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षक व शिक्षकेतर बांधवांनी परिश्रम घेतले.          या अभिनव उपक्रमाला विद्यालयाचे चेअरमन अॅड. संभाजीराव भीलाजीराव देवकर, सचिव अॅड. भरतराव देवकर, मुख्याध्यापक श्री. श्री जे. एस. पाटील, पर्यवेक्षक श्री. एस. एस. गोसावी, सांस्कृतिक विभाग, प्रमुख श्री.आर.एच ठाकूर यासह सर्व शिक्षक-शिक्षिका, पालक बंधू भगिनी यांनी उत्स्फूर्त उपस्थिती लावून मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद दिला. सर्वांनी मिळून विद्यालयातील या संस्कारमय व प्रेरणादायी उपक्रमाचे आणि सहभागी विद्यार्थ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले.  या रक्षाबंधन सोहळ्याने केवळ बांधिलकीचे धागेच नव्हे, तर प्रेम, जिव्हाळा, जबाबदारी आणि पर्यावरण संवर्धनाचे नातेही घट्ट विणले. त्यामुळे हा दिवस विद्यालयाच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदला जाणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776698202.623c21d4 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776680033.61057a3e Source link

error: Content is protected !!