Homeताज्या बातम्यामीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक निर्मित ʻ शैक्षणिक साहित्य प्रदर्शन ʼ संपन्न शिंदखेडा...

मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक निर्मित ʻ शैक्षणिक साहित्य प्रदर्शन ʼ संपन्न शिंदखेडा नव्हे तर जिल्ह्यात पहिला स्व शिक्षक निर्मिती शैक्षणिक साहित्य उपक्रम. स्वप्नील देसले यांचे प्रतिपादन*

*मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक निर्मित ʻ शैक्षणिक साहित्य प्रदर्शन ʼ संपन्न शिंदखेडा नव्हे तर जिल्ह्यात पहिला स्व शिक्षक निर्मिती शैक्षणिक साहित्य उपक्रम. स्वप्नील देसले यांचे प्रतिपादन*
शिंदखेडा येथील शिंदखेडा तालुका एज्युकेशन ट्रस्ट संचलित मीराबाई गर्ल्स हायस्कूलमध्ये शिक्षक निर्मित शैक्षणिक साहित्य प्रदर्शन भरविण्यात आले होते. शिक्षकांना दैनंदिन अध्यापन प्रक्रियेसाठी साहाय्यक अशा शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे उद्‌घाटन संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरूवात प्रतिमापूजन व दीपप्रज्वलन करून मान्यवरांच्या हस्ते झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे सचिव आनंदा चौधरी यांनी भूषविले. प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे अध्यक्ष स्वप्नील देसले उपस्थित होते. मुख्याध्यापक जे. पी. पाटील, पर्यवेक्षक व्ही. आर. महाले, श्रीमती एस. जे. कुलकर्णी, आदर्श पत्रकार यादवराव सावंत व्यासपीठावर विराजमान होते.
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात ए. बी. पाटील यांनी शैक्षणिक साहित्यांची अध्ययन-अध्यापन प्रक्रियेतील भूमिका स्पष्ट करताना सांगितले की, विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रीत करण्यासाठी, संकल्पना स्पष्ट करण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूतीने संकल्पना दीर्घकाळ किंवा कायमस्वरूपी स्मरणात राहण्यासाठी, अध्ययन अध्यापन मनोरंजक करण्यासाठी, अध्ययनात विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग वाढविण्यासाठी, अध्ययन -अध्यापनाची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी शैक्षणिक साहित्य महत्त्वपूर्ण ठरतात असे सांगितले.
मुख्याध्यापक जे. पी. पाटील यांनी विद्यार्थिनींना मार्गदर्शन करताना सांगितले की, शैक्षणिक साहित्याचे अध्ययन अध्यापन प्रक्रियेत खूप महत्त्व आहे म्हणून या स्तुत्य उपक्रमाचे आयोजन केले आहे. शिक्षकांनी अध्यापनात काळानुसार बदल करावा. अभ्यासात विद्यार्थ्यांचा कृतियुक्त सहभाग वाढवावा. विद्यार्थिनींमध्ये सर्जनशीलता निर्माण करावी. या शैक्षणिक साहित्यांचा वापर मर्यादित न ठेवता दैनंदिन अध्ययन अध्यापन प्रक्रियेत त्याचा उपयोग करावा. विद्यार्थिनींना चार भितींच्या आत बंदिस्त न ठेवता त्यांना खुल्या वातावरणात फुलू द्या, असे आवाहन केले. शिक्षकांनी शालेय विषयांशी सुसंगत असे शैक्षणिक साहित्य बनवले होते. या प्रदर्शनातील सर्वात उत्तम शैक्षणिक साहित्य बनविणाऱ्या शिक्षकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात येणार आहे.
प्रदर्शनात पाचवी ते दहावीला अध्यापन करणाऱ्या सर्व शिक्षक शिक्षिका यांनी त्यांच्या विषयाला अनुसरून शैक्षणिक साहित्याची निर्मिती केली होती. ‌प्रदर्शनात प्रतिकृती, वर्किंग मॉडेल्स, तक्ते आदींचा समावेश होता. मान्यवरांनी शैक्षणिक साहित्य प्रदर्शनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केले. कार्यक्रमास सर्व शिक्षक, शिक्षिका, विद्यार्थिनी हजर होत्या. शैक्षणिक साहित्याची मांडणी करण्याचे काम प्रोजेक्ट हेड म्हणून अतुल मराठे व व्ही. टी .चौधरी यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन ए. बी. पाटील यांनी केले. आभार प्रदर्शन एस. पी. भावसार यांनी केले. ✍️ *संपादक यादवराव सावंत शिंदखेडा*

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांत अधिकारी कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा

जिल्हाप्रमुख शानाभाऊ सोनवणे यांच्या नेतृत्वात शिरपूर प्रांताधिकारी कार्यालयावर जनआक्रोश शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) दिनांक ८ जून २०२६ वार सोमवार रोजी सकाळी १० वाजता शिरपूर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780663206.19392015 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780645115.1833754f Source link

error: Content is protected !!