Homeराजकीयशिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निघणार नव्याने -30 जुनला सोडत...

शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निघणार नव्याने -30 जुनला सोडत डिसेंबर 24 व मार्च 25 रोजीचे निघाले सरपंच पदाचे आरक्षण रद्द.

शिंदखेडा तालुक्यातील १२३ ग्रामपंचायत सरपंच पदाचे आरक्षण निघणार नव्याने -30 जुनला सोडत
डिसेंबर 24 व मार्च 25 रोजीचे निघाले सरपंच पदाचे आरक्षण रद्द.

( संपादक यादवराव सावंत शिंदखेडा )

शिंदखेडा तालुक्यातील 123 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी 30 जून 2025 रोजी अकरा वाजता नव्याने आरक्षण सोडत शिंदखेडा तहसील कार्यालयात होणार असल्याचे तहसीलदार अनिल गवांदे यांनी कळविले आहे.

ग्रामविकास विभाग यांच्याकडे 5 मार्च 2025 रोजीच्या अधिसूचनेनुसार, यापूर्वी शिंदखेडा तालुक्यात माहे मार्च 2025 मध्ये 100 ग्रामपंचायतींच्या 2025-2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या सरपंच पदाच्या निवडणुकीकरिता आरक्षण सोडत घेण्यात आली होती. पेसाव्यतिरिक्त असलेल्या 123 ग्रामपंचायतीं पैकी अनुसूचित जाती करिता 7 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता 26 ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 33 ग्रामपंचायती तर उर्वरित 57 पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात आली होती.
तथापि, ग्रामविकास विभाग मंत्रालय, मुंबई, यांचेकडील दिनांक 13 जून 2025 रोजीच्या राजपत्रातील सुधारित निर्देशानुसार, यापूर्वी घेण्यात आलेली आरक्षण सोडत रद्द करून नव्याने आरक्षण सोडत घेणेबाबत सूचित करण्यात आले आहे.
त्यानुसार मा. जिल्हाधिकारी धुळे यांच्याकडिल दि. 17 जून 2025 रोजीच्या आदेशानुसार, शिंदखेडा तालुक्यातील 2025 ते 2030 या कालावधीत मुदत संपणाऱ्या 123 ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी आरक्षण सोडत सभा दिनांक. 30/6/2025 सोमवार रोजी सकाळी 11:00 वाजता नवीन प्रशासकीय इमारत, तहसील कार्यालय शिंदखेडा येथे आयोजित करण्यात आली आहे. सुधारित आरक्षणानुसार, पेसाव्यतिरिक्त असलेल्या 123 ग्रामपंचायतींपैकी अनुसूचित जाती करिता 7 ग्रामपंचायती, अनुसूचित जमाती करिता 26 ग्रामपंचायती, नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरिता 33 ग्रामपंचायती तर उर्वरित 57 पदे सर्वसाधारण प्रवर्गाकरिता आरक्षित करण्यात येणार आहेत. सदर आरक्षण सोडत सभेसाठी तालुक्यातील सर्व आजी-माजी जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, आजी-माजी सरपंच, उपसरपंच, आजी-माजी ग्रामपंचायत सदस्य, तसेच विविध राजकीय पक्षाचे पदाधिकारी व नागरिक यांनी उपस्थित राहणेबाबत अनिल गवांदे यांनी प्रसिद्धी पत्राद्वारे आवाहन केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776661991.5fa62c13 Source link

नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी...

नरडाणा येथे "१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची" जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवात ✍️ शिंदखेडा माझा ( संपादक  यादवराव सावंत) प्राथमिक...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776643860.5f372b1c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776625784.5e8daacd Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776607698.5cfebb07 Source link

error: Content is protected !!