नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियानची” जि. प. मा. सभापती सौ. संजीवनी सिसोदेंच्या अध्यक्षतेखाली यशस्वी सुरुवात

✍️ शिंदखेडा माझा ( संपादक यादवराव सावंत)
प्राथमिक आरोग्य केंद्र, नरडाणा येथे “१०० दिवसांत टीबी मुक्त भारत अभियान” अंतर्गत विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अभियानाची सुरुवात धुळे जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्यान सभापती मा.संजीवनीताई सिसोदे यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात झाली. उपक्रमांतर्गत टीबी रोगाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच टीबी निर्मूलनासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमात एकूण ११० एक्सप्रेस लाभार्थी रुग्णांची नोंदणी व तपासणी करण्यात आली.
यावेळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. आसिफ कच्ची, टी बी निर्मूलनचे तालुका, जिल्हा अधिकारी, डॉ. मनोज राजपूत तसेच इतर सर्व आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, रुग्ण व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच या कार्यक्रमासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिनजी बोडके, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. रुचिरा पवार तसेच डॉ. सोनिया बागडे मॅडम डिस्ट्रिक्ट टीबी ऑफिसर यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या सर्व कर्मचारी वर्गाने विशेष परिश्रम घेतले.





















