Homeताज्या बातम्याविरदेल ते अक्कडसे बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून तुटलेल्या पाईप ची...

विरदेल ते अक्कडसे बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून तुटलेल्या पाईप ची दुरुस्ती करा – शेतकऱ्यांची मागणी

विरदेल ते अक्कडसे बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून तुटलेल्या पाईप ची दुरुस्ती करा – शेतकऱ्यांची मागणी

प्रतिनिधी शिंदखेडा – तालुक्यातील विरदेल ते अक्कडसे बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरूम टाकून तुटलेल्या पाईप ची दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी अमळथे, वरसुद व वरपाडे शिवारातील शेतकऱ्यांनी केली आहे.शिंदखेडा येथे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात दिनांक 9 जून रोजी सकाळी 11 वाजता सर्व शेतकरी बांधव एकत्रित झाले होते.यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अधिकारी यांना याबाबत निवेदन देण्यात आले.सदर निवेदन स्थापत्य अभियंता पंकज भामरे यांनी स्वीकारले. निवेदनात म्हटले आहे की,विरदेल ते अक्कडसे या दोन गावा दरम्यान रस्त्याचे डांबरीकरण होत आहे.सदर रस्ता विरदेल पासून अक्कडसे कडे अंदाजे तीन ते चार किलोमीटर पर्यंत बनला आहे.परंतु त्याच्या पुढील रस्ता अद्यापही बनला नाही.तांत्रिक अडचणीमुळे काम रखडले असल्याचे समजले आहे.सोनेवाडी फाट्यापासून विरदेल कडे जाणाऱ्या रस्त्यावर मुरूम टाकण्याचे काम झाले होते मध्यंतरी या रस्त्यावर मुरूम टाकला गेला नाही,बांधकाम अपूर्ण असलेल्या रस्त्यावर मुरूम नसल्याने शेतकऱ्यांची गैरसोय होत आहे.तसेच सदर रस्त्यावर सोनेवाडी फाट्यापासून अर्धा किलोमीटर अंतरावर असलेल्या मोरीचा पाईप फुटल्याने पावसाळ्यात बैलांचे पाय मोरीच्या तुटलेल्या पाईपात जाऊन मोठे अपघात होऊ शकतात यासाठी सदर रस्त्यावर मुरूम टाकून तुटलेला पाईप दुरुस्त करून शेतकऱ्यांची होणारी गैरसोय टाळावी अशी विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.प्रशासनाने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा शेतकरी बांधवांतर्फे मोठे आंदोलन उभारण्यात येईल व होणाऱ्या परिणामास प्रशासन जबाबदार राहील असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. यावेळी सदानंद मराठे, भूषण पवार, कैलास तलवारे, भगवान मराठे, कैलास मराठे, भाजपा शहराध्यक्ष संजय कुमार महाजन, यादवराव मराठे,संदीप चौधरी, बन्सीलाल बोरसे,श्रावण मराठे, मनोज पाटील, मोहन पवार, आनंदा मराठे, सुनील बडगुजर, फारुक शेख हमीद, राजेंद्र मराठे,भैय्या मराठे उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780754078.1d412373 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780736031.1c5400c0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780717892.1b910fdf Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780699820.1b2fbb5c Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1780681304.1a3d6d10 Source link

error: Content is protected !!