- विरदेल ग्रा. पं. ग्रामसेवक डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला गैरहजर कारवाईची मागणी.👉 बेजबाबदार व उर्मटपणाची हद्द सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

✍️शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत) :-शिंदखेडा तालुक्यातील विरदेल येथील ग्रामपंचायत चे ग्रामसेवक राहुल रायसिग महामानव व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती उत्सवा करीता विरदेल ग्रामपंचायत कार्यालयात उपस्थित राहीले नाहीत. कर्तव्यात कसूर केल्या बद्दल त्यांच्यावर कायदेशिर योग्य ती कार्यवाही करावी. तसेच माझे कोणी काही करू शकत नाही….. अशा अविर्भावाने राहणारे व उर्मटपणे वागणाऱ्या जबाबदार व्यक्तींवर कठोर कारवाई करावी.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती उत्सवा करीना उपस्थित रहा.अशी विनंती करुनही सदर कर्मचारी हजर राहीले नाहीत. या संदर्भात काही PROTOCOL आहे
का १ हया तक्रारीची दखल घेवून, त्वरीत RAPID ACTION, कार्यवाही करावी.यासाठी शिंदखेडा गटविकास अधिकारी पंचायत समिती यांना विरदेल येथील राजेंद्र जगन्नाथ बैसाणे (सामाजिक कार्यकर्ता)यांनी निवेदनातुन मागणी केली आहे. सदरचे निवेदन धुळे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना मेल द्वारे पाठवली आहे.









