रस्त्याच्या नित्कृष्ठ दर्जाचे कामा मुळे चिमठाणे गावतील नागरिक करणार 15 एप्रिल ला जन आक्रोष रस्ता रोको आंदोलन. 👉सा.बा. विभाग व ठेकेदार यांचा मात्र मनमानी कारभार सुरूच रस्त्याच्या नित्कृष्ठ दर्जाचे कामाकडे मात्र दुर्लक्ष. 👉 केद्रीय मंत्री ना. नितीन गडकरी व सा. बा. विभाग यांना निवेदन ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल न्युज संपादक यादवराव सावंत
चिमठाणे चौफुली ते पिपरी गावालगत असलेल्या रस्त्याच्या कामात अतिशय नित्कृष्ठ दर्जाचे काम झाल्याने चिमठाणे गावातील नागरिकांनी पुन्हा पंधरा एप्रिल ला जन आक्रोश आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा दिला असून गेल्या सहा महिने पासून कुठल्याही प्रकारची ठोस उपाय योजना करण्यात आले नाही. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी चिमठाणे गावतील नागरिकांना अनेक वेळा उडवा उडवीचे उत्तर देऊन थाथुर माथूर काम करून तसेच कारण दाखवून असे भाषेत सांगून जातात की होईल काम वेळ लागेल राजकीय दबाव येतो अश्या प्रकारे कारण सांगून सदर बांधकाम विभाग धुळे हे कुजकामी ठरत असून संबंधित ठेकेदाराला काम दिले असून परंतु रस्त्याच्या कामात कुठल्याही प्रकारची कॉलिटी नसल्याने रस्त्यावर धूर निर्माण होत असल्याने नागरिकांना यांचा त्रास सहन करावा लागतो तरी सुद्धा सार्वजनिक .बांधकाम विभाग ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन देखील कामाकडे दुर्लक्ष करत असल्याचे स्पष्ट चित्र उघडपणे दिसत असून चिमठाणे गावातील सामाजिक कार्यकर्ते माजी सैनिक महेंद्र गोकुळ पाटील ( सोनू फौजी )यांनी अनेक वेळा लेखी तक्रार देऊन देखील तसेच गेल्या महिन्यात रास्ता रोको आंदोलन देखील करण्यात आले होते तरीही सुद्धा सा.बा.विभाग खोटें आश्वासन देऊन नागरिकांची दिशा भूल करत असल्याचा आरोप चिमठाणे गावातील नागरिकांनी केलेला असून सदर ठेकेदाराला कोणाचा आशीर्वाद आहे का कारण ठेकेदार सा.बा.विभाग याचे देखील कॉल कट करतो यांचा अर्थ सर्व गोष्टी भोंगळ कारभार असल्याचे स्पष्ट चित्र दिसत आहे. कारण ह्या रस्त्याच्या कामात कोट्यवधी रुपयांचा खर्च करून देखील रस्त्यावर सर्व माती धूर निघत असून खरोखरच शासन मध्ये पारदर्शक कारभार चालतो की दोन नंबर चा व्यवसाय सुरू करून संबंधित सा.बा.विभाग याची मनमानी कारभार सुरू आहे याची देखील चौकशी होण्याची गरज आहे. वारंवार पत्र देऊन देखील सा.बा. विभाग काम दुर्लक्ष करत असून संबंधित ठेकेदाराला पाठीशी घालत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. एका वर्षात रस्त्याचे तीन तेरा वाजले असून रस्त्याच्या दुतर्फा रुंदीकरण देखील कमी असल्याने प्रवासी वाहतूक कोंडी होत असते. 15 तारखे पर्यत काम न झाल्यास चिमठाणे गावतील नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित राहून रस्ता रोको जन आक्रोश आंदोलन करनार आहेत असे पत्र चिमठाणे गावातील नागरीक व महेंद्र पाटील ( सोनू फौजी )यांनी सा.बा. विभाग तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी याना देखिल पाठवले असून आंदोलन दरम्यान कुठल्याही प्रकारचे अनुचित प्रकार घडल्यास सर्वस्वी जबाबदारी प्रशासनाची राहील अशी माहिती महेंद्र पाटील ( सोनू फौजी )यांनी दिलेली आसून तरी ठेकेदार पवन देशमुख व ठेकेदार दिपक जैन यांचा वर गुन्हा दाखल करावा व लायसन्स ब्लॅक लिस्ट करणायत यावे अशी मागणी गावकरी करत आहे आता यावर प्रशासन कोणत्या प्रकारची कार्यवाही करते का हे पाहणे गरजेचं आहे……


















