क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी सरकार कटिबद्ध -पालकमंत्री जयकुमार रावल
शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत )
क्रांती सुर्य महात्मा ज्योतिबा फुले व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी सरकार कटिबद्ध -पालकमंत्री जयकुमार रावल मालपुर येथे 50लक्ष रू खर्च करून महात्मा फुले मंगल कार्यालयाच्या लोकार्पण प्रसंगी राज्याचे पणन व राजशिस्टाचार व पालकमंत्री मंत्री जयकुमार रावल यांनी प्रतिपादन केले. 
मालपुर ता.शिंदखेडा येथे माळी समाजाच्या महात्मा फुले सामाजिक बहुउदेशीय सभागृहा साठी 50 लक्ष रू.राज्याचे केबिनेट मंत्री व धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री ना.जयकुमार रावल यांनी मंजूर केले होते त्या कामाचे लोकार्पण त्यांच्या हस्ते करण्यात आले.
अद्यावत अशा या सभागृहात मुळे अनेक समाज उपयोगी कार्यक्रम व लग्न समारंभ होण्यास सोयीचे होईल म्हणून लोकांनी समाधान व्यक्त केले. या कार्यक्रम प्रसंगी जि.प.चे माजी आरोग्य सभापती महावीरसिंग रावल,भाजप जिल्हाध्यक्ष बापु खलाणे, मार्केट कमिटीचे चेअरमन नारायण पाटील, डॉ सुशील महाजन,नेरचे माजी सरपंच शंकरराव खलाणे,आर.के.माळी, नगरसेवक प्रविण महाजन, प्रविण माळी, बापू महाजन, नगरसेवक ललित माळी, नगरसेवक सुभाष जगताप, नगराध्यक्ष कलाबाई माळी, पंढरीनाथ अहिरे,अकलाडचे आबा भदाणे, नरेंद्र सुर्यवंशी व वंसत बोरसे, तसेच आयोजक समस्त माळी समाजाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते माता भगिनी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


















