- शिंदखेडा येथे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३५ व्या जयंती निमित्ताने आज विविध कार्यक्रमाचे आयोजन
👉विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,शिंदखेडा यांचे नियोजन.
- ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
-
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 135 व्या जयंती महोत्सव 2026 च्या निमित्ताने, सर्व समाज बांधवांना सस्नेह 🩵जय भिम 🙏 विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती,शिंदखेडा यांचे नियोजनातुन आज शिंदखेडा येथील तहसील कार्यालयाजवळील पुतळ्या जवळ तसेच शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असुन बुद्ध अनुयायी तसेच शिंदखेडा शहरातील सामाजिक, शैक्षणिक, राजकीय व इतर सर्व संघटना पदाधिकारी, विविध विभागात काम करणारे शासकीय अधिकारी, कर्मचारी आणि शहरातील तमाम नागरिकांनी जयंती उत्सव कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन उत्सव समितीच्या वतीने करण्यात येत आहे.
*🌹कार्यक्रमाची रूपरेषा 🌹*
1)दि. 13/04/2026 ला रात्री 12:00 वाजता, केक कापणे
2)दि.14/04/2026 सकाळी 9:00 वाजता सामूहिक बुद्ध वंदना
3)दि. 14/04/2026 ला सकाळी 11:00 वाजता, गरजू होतकरू गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
4)14/04/2026 , दुपारी 1:00 वाजता, रुग्णांना फळे वाटपाचा कार्यक्रम
5)14/04/2026, सायंकाळी 7:00 वाजता
कॉलनी परिसरातून मिरवणूक
समाज बांधवांनी वरील नमूद कार्यक्रमात परिवारासह,इष्टमित्रांसह मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर उत्सव समिती शिंदखेडा च्या वतीने नम्र निवेदित आहे.


















