शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न
👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल (DDFC)यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक.  ✍️शिंदखेडा माझा (.संपादक  यादवराव सावंत) :
👉
शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा प्र. न. येथे युवा क्रिकेट मंडळ आयोजित तावखेडा प्रीमियर लीग अर्थात टी पी एल उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा नुकतीच संपन्न झाली. सदर स्पर्धेला एकूण 40 संघ सहभागी झाले होते.स्पर्धा पंधरा दिवस चालल्या असून अंतिम सामना दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल ( DDFC) विरुद्ध एकलव्य क्रिकेट क्लब ओसर्ली आयने यांच्यात झाला हा सामना अत्यंत शेवटच्या चेंडूपर्यंत चुरशीचा झाला होता त्यात दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल या संघाने विजयश्री खेचून आणली त्यांना प्रथम क्रमांकाचे 41 हजाराचे पारितोषिक व पराभूत संघ एकलव्य क्रिकेट क्लब ओसरली यांना 21 हजाराचे पारितोषिक आयोजकांच्या मार्फत देण्यात आले. सदर स्पर्धा गाव व परिसरातील ग्रामस्थ युवकांसाठी एक प्रकारे आनंद उत्सव, प्रेरणादायी ठरल्यात.
सदर स्पर्धेचे उद्घाटन सोनू जयसिंग गिरासे रोजगार सेवक ग्रामपंचायत तावखेडा व रणजित गांगजी गिरासे माजी कप्तान तावखेडा यांचे हस्ते करण्यात आले होते.सदर स्पर्धेसाठी समालोचक (कॉमेट्री) भाऊसाहेब शिंदे, गुलाबसिंग गिरासे, जवानसिंग गिरासे, दीपक गिरासे, विष्णू ईशी,जितेंद्र सिंग गिरासे, नवलसिंग राउळ, महेंद्रसिंग गिरासे हयांनी केले होते . अंतिम सामना दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल विरुद्ध एकलव्य क्रिकेट क्लब ओसरली आयने यांच्यात झाला हा सामना शेवटच्या चेंडूपर्यंत रंगतदार झाल्याने दोन्ही संघांमध्ये धाकधुक होती.यावेळी दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कलचे गोलंदाज डॉ.दीपक परमार यांनी पहिल्याच षटकांमध्ये दोन बाद केल्याने तसेच आपल्या तीन षटकात तीन बाद केले व एक उत्तुंग झेल घेतल्याने सामना जिंकण्यासाठी त्यांनी मोलाची कामगिरी केली.पंच म्हणून रणजित भाया गिरासे तावखेडा , सर्पमित्र कल्याण पाटील लंघाणे यांनी काम पाहिले. दोंडाईचा क्रिकेट डॉक्टर फ्रेंड सर्कलचे विजयी खेळाडू असे – कर्णधार दयाराम कुवर सर, डॉ. मनीष गिरासे, डॉ. दीपक परमार, अजय ठाकरे, गोकुळ जवरी, दादा पाटील, आशिक सय्यद भाई, जितू गुप्ता, राजेश कुकरेजा, संजू शर्मा, रितेश कुलकर्णी यांनी या संघात उत्कृष्ट कामगिरी केली या प्रसंगी कर्णधार दयाराम पवार सर यांनी हा अंतिम सामना विजयश्री खेचून आणण्यासाठी संघातील सर्व खेळाडू यांच्या सांघिक कामगिरीमुळे आम्हाला हा विजय मिळवता आला. यासाठी आयोजकांनी आम्हाला वेळोवेळी बहुमूल्य सहकार्य केल्याने त्यांचे आभार मानले. याप्रसंगी मान्यवरांनी आपल्या मनोगतातून ग्रामीण भागात अशा स्पर्धा भरवणे युवकांसाठी प्रेरणादायी ठरणार असून भविष्यात त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव मिळून त्यांचे भविष्य उज्वल होऊ शकते असे सांगितले.सदर स्पर्धैचे आयोजन तावखेडा प्र. न. युवा क्रिकेट मंडळाने तावखेडा प्रीमियर लीग तथा टी. पी. एल. या बॅनर खाली संपन्न झाल्या. यासाठी आयोजक रणजीत गांगजी गिरासे, भरतसिंग मोहनसिंग गिरासे, प्रेमसिंग चंद्रसिंग गिरासे, जवानसिंग धनसिंग गिरासे, मोतीलाल श्रावण निकम, प्रेमसिंग भवानसिंग गिरासे, महेंद्र निंबा गिरासे, दीपक धोंडू गिरासे, विष्णू किसन ईशी, योगेश रमेश चित्ते,सोनू जयसिंग गिरासे यांनी उत्कृष्टरित्या आयोजन करून सदर स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडल्या त्यासाठी ग्रामस्थ व परिसरातील युवा तरुणांचे विशेष सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न...

शिंदखेडा तालुक्यातील तावखेडा येथे टी. पी. एल. उन्हाळी खुल्या क्रिकेट टेनिस बॉल स्पर्धा संपन्न 👉 दोंडाईचा डॉक्टर फ्रेंड सर्कल (DDFC)यांना प्रथम क्रमांकाचे पारितोषिक*.     ...

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर

शिंदखेडा : मीराबाई गर्ल्स हायस्कूलच्या दोन विद्यार्थिनींना भारत सरकारची NMMS शिष्यवृत्ती जाहीर ✍️शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत  : 👉भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयामार्फत घेतल्या जाणाऱ्या नॅशनल मीन्स...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777169081.1fe4a862 Source link

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.             ...

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.                        ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल...

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले,...

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले, गळाही दाबला, जागीच मृत्यू, आरोपी दाम्पत्य गजाआड.       ...

error: Content is protected !!