Homeताज्या बातम्याशहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके...

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले, गळाही दाबला, जागीच मृत्यू, आरोपी दाम्पत्य गजाआड

शहाद्याच्या कळंबूत मर्डर : मामाच्या शालकासह त्याच्या पत्नीचे निर्दयी कृत्य; युवकाचे डोके भिंतीवर आपटले, गळाही दाबला, जागीच मृत्यू, आरोपी दाम्पत्य गजाआड.                                   ✍️ शिंदखेडा माझा लाला चव्हाण शहादा वडाळी प्रतिनिधी

शहादा एका ३५ वर्षीय युवकाची त्याच्याच मामाच्या शालकाने पत्नीसह मिळून हत्या केल्याची धक्कादायक घटना शहादा तालुक्यातील कळंबू येथे उघडकीस आली आहे. दीपक भटू बोरसे असे खून झालेल्या तरुणाचे नाव असून, त्याची निर्दयीपणे हत्या करणाऱ्या मनोज प्रताप पाटील आणि त्याची पत्नी रत्‍नाबाई अशा दोघांनाही सारंखेडा पोलिसांनी अटक केली आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दीपकच्या मामाच्या मुलीचे आधीच विवाह झाला होता. तिच्या पतीचे निधन झाल्‍यानंतर तिचा दुसरा विवाह जुळविण्‍याचा प्रयत्‍न झाला. मात्र, हा दुसरा विवाह काही कारणास्तव तुटला होता. यानंतर ती ‘मला आत्याचा मुलगा (दीपकचा मोठा भाऊ) आवडतो त्याच्याशी लग्न लावून द्या’, म्हणून वडिलांच्या मागे लागली होती. अशातच दोन-तीन दिवसांपूर्वी ती घरी कोणालाही काहीही न सांगता आत्याच्या घरी कळंबू येथे निघून आली होती. याची माहिती मिळाल्यानंतर मामाचा शालक मनोज प्रताप पाटील हा पत्नी रत्‍नाबाई (रा. होळ, ता. शिंदखेडा, जि. धुळे) सोबत हा भाचीच्या शोधात कळंबू येथे आला होता.
मात्र, हे दोघे कळंबू येथे पोहोचण्याच्या आधीच दीपकचा मोठा भाऊ आणि मनोजची भाची हे दोघे खरेदीसाठी सुरतला निघून गेले होते. मनोज व त्याच्या पत्नीने कळंबूत पोहोचल्यानंतर दीपकची भेट घेऊन ‘आमची भाची कुठे गेली’ अशी विचारणा केली. यावर त्याने दोघेही सुरतला गेल्याचे सांगितले. मात्र, यावर विश्वास न ठेवता मनोजने ‘तू खोटे बोलत आहेस, माझी भाची इथेच आहे’, असे म्हणत दीपकशी वाद घालायला सुरुवात केली. हा वाद वाढल्यानंतर मनोज व रत्‍नाबाईने थेट दीपकवर हल्ला चढवला.
यावेळी मनोज इतका रागात होता की त्याने दीपकची गचांडी पकडून त्याचे डोके भिंतीवर आपटले. यानंतर तसेच मारहाण करीत त्याला घराबाहेर अंगणात आणले. येथेही मनोजने पुन्हा दीपकचे डोके भिंतीवर आपटले. यात मार लागून दीपक खाली पडल्यानंतर रत्‍नाबाईने त्याला धरून ठेवले तर मनोजने दीपकचा गळा आवळला. डोक्याला लागलेला मार आणि त्यातच दाबलेला गळा यामुळे श्वास गुदमरला गेल्याने दीपकचा जागीच मृत्यू झाला.
दीपकचे चुलत भाऊ आणि कळंबूचे सरपंच आर.आर. बोरसे व अन्य नातेवाईक घटनास्थळी पोहोचेपर्यंत दीपकने दम तोडला होता. याच दरम्यान घटनेची माहिती सारंगखेडा पोलिसांना कळविण्यात आली. सारंगखेडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ कळंबू येथे धाव घेत दीपकचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी शहादा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलवला. तसेच या खुनामुळे निर्माण झालेली तणावाची परिस्थिती आटोक्यात आणली.
दरम्यान, पोलिसांनी मनोज प्रताप पाटील व त्याचे पत्नी रत्‍नाबाई या दोघांनाही दीपक बोरसेच्या खून प्रकरणात अटक केली असून, या दोघांवरही भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. सध्या सहायक पोलीस निरीक्षक रवींद्र बागुल या प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777169081.1fe4a862 Source link

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.             ...

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.                        ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777151034.1e7219f0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777132965.f4463afa Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777114895.f0bd0cf7 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777169081.1fe4a862 Source link

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.             ...

शहादा पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी पदी डी.डी.राजपूत यांचे नियुक्ती.                        ✍️ शिंदखेडा माझा पोर्टल...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.d3a0d517.1777151034.1e7219f0 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777132965.f4463afa Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.5c173317.1777114895.f0bd0cf7 Source link
error: Content is protected !!