Homeताज्या बातम्यासेवा पंधरवडानिमित्त माळीच येथे सिद्धार्थ सिसोदेंनी केले 'स्मार्ट सुनबाई" सह विविध स्पर्धांचे...

सेवा पंधरवडानिमित्त माळीच येथे सिद्धार्थ सिसोदेंनी केले ‘स्मार्ट सुनबाई” सह विविध स्पर्धांचे आयोजन –

सेवा पंधरवडानिमित्त माळीच येथे सिद्धार्थ सिसोदेंनी केले ‘स्मार्ट सुनबाई” सह विविध स्पर्धांचे आयोजन –

. ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)               शिंदखेडा तालुक्यातील माळीच येथे दि 26 सप्टेंबर, पंतप्रधान मा.नरेंद्रजी मोदी यांचा 75 वा वाढदिवसानिमित्त प्रदेश भाजपचा सेवा पंधरवडा अभियान राबविण्याचा संकल्प आणि पणन व राजशिष्टाचार मंत्री तथा पालकमंत्री धुळे ना. जयकुमारजी रावल यांच्या सूचनेनुसार सिद्धार्थ सिसोदे यांनी माळीच ग्रामपंचायत, तापी परिसर शिक्षण प्रसारक मंडळ आश्रम शाळा व माध्यमिक शाळा व जि.प.प्राथमिक शाळा यांच्या संयुक्त विद्यमानाने माळीच गावात विविध स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन केले.                        स्वच्छतेला प्रोत्साहन म्हणून माळीच गावात खास महिलांसाठी ‘स्मार्ट सुनबाई’ – स्वच्छ अंगण सुंदर रांगोळी’ ही स्पर्धा घेण्यात आली. कै. म. दि. सिसोदे महाविद्यालयाच्या प्राध्यापकांनी रांगोळीचे परीक्षण केले. गावातील तीनही शाळेत स्वच्छता अभियान राबवून रांगोळी स्पर्धेबरोबर पंतप्रधान श्री मोदीजींच्या जीवनावर आधारीत निबंध, वकृत्व व चित्रकला तसेच विविध क्रीडा स्पर्धा घेण्यात आल्या. माळीच आश्रम शाळेच्या अंगणात दुपारी 4 वाजता शाळेतील विद्यार्थ्यांनी आदिवासी नृत्य, वासुदेवाची वारी असे सुंदर सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. नंतर सांस्कृतिक स्पर्धा व ‘रन फॉर मोदी’ – मॅरेथॉन स्पर्धा घेण्यात आली. यानंतर प्रमुख पाहुण्यानी रांगोळी प्रदर्शनास भेट दिली, ‘एक पेड मोदी के नाम’ वृक्षारोपणही केले. मौखिक आरोग्य व दातांची काळजी या विषयावर दोंडाईचा उपजिल्हा रुग्णालयाच्या दंत शल्यचिकित्सक डॉ. युगंधारा सिद्धार्थ सिसोदे यांनी मार्गदर्शन केले.                बक्षीस वितरण श्री. नारायण भाऊसाहेब पाटील. सभापती- दोंडाईच्या कृषी उत्पन्न बाजार समिती यांच्या अध्यक्षतेखाली व सौ. संजीवनी संजय सिसोदे. सभापती जि.प.धुळे, श्री.डी.एस. गिरासे, सरचिटणीस धुळे जिल्ह्या भाजप, श्री जिजाबराव पवार अध्यक्ष उद्योग आघाडी धुळे जिल्हा भाजप, श्री दीपक बागल. दोंडाईचा मंडळ अध्यक्ष, श्री. मोतीलाल वाकडे. शिंदखेडा मंडळ अध्यक्ष यांच्या प्रमुख उपस्थितीत परिसरातील वाघोदेचे सरपंच योगेश ठाकरे, आशिष ठाकरे, संतोष माळी गिण्याणबापू, मनोज ठाकरे, विटाईचे उपसरपंच संजय शिरसाट सुभाष पवारसह अनेक मान्यवर महिला भगिनी उपस्थित होत्या.   कार्यक्रमाचे अध्यक्ष नारायण भाऊसाहेब यांनी सिद्धार्थ सिसोदे व सहकाऱ्यांनी सेवा पंधरवड्यात सुंदर व सर्वसामावेशक स्पर्धात्मक कार्यक्रम घेतल्याबद्दल कौतुक केले व स्पर्धेतील विजेत्यांचे अभिनंदन केले. सुंदर कार्यक्रम आयोजनाबद्दल आश्रम शाळेचे अध्यक्ष भूषण पाटील, विश्वास देसले व सहकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना श्री सिद्धार्थ सिसोदे म्हणाले की, एका दिवसात या सुंदर कार्यक्रमाचे आयोजन फक्त माळीच ग्रामपंचायत, तीनही शाळांचे सहकार्य व स्पर्धकांच्या सहभागामुळे शक्य झाले. सौ. संजीवनी सिसोदे यांनी सर्व मान्यवरांनी उपस्थिती दिली तसेच महिलांनी घरांगण स्वच्छ करून सुंदर रांगोळ्या काढून गाव स्वच्छ केले त्याबदल आभार व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आश्रम शाळेचे मुख्याध्यापक श्री जितेन्द्र पाटील, माध्यमिकचे संतोष पाटील सर व वाय.जी.पाटील सर व जि. प. शाळेचे बोरसे सर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सरपंच सौ. प्रतीक्षा देसले सह सर्व शिक्षक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका व बचत गट महिलांनी सहकार्य लाभले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!