Homeताज्या बातम्यासाहूरच्या सोनवणे परिवाराचे मातृछत्र हरपले! 👉 ग.भा.मनुबाई रामभाऊ सोनवणे यांचे निधन, उद्या...

साहूरच्या सोनवणे परिवाराचे मातृछत्र हरपले! 👉 ग.भा.मनुबाई रामभाऊ सोनवणे यांचे निधन, उद्या (23 सप्टेंबर )रोजी 11 वा.अंत्ययात्रा.                 

साहूरच्या सोनवणे परिवाराचे मातृछत्र हरपले!

ग.भा.मनुबाई रामभाऊ सोनवणे यांचे निधन, उद्या (23 सप्टेंबर )रोजी 11 वा.अंत्ययात्रा.                   ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)

ग.भा. मनुबाई रामभाऊ सोनवणे यांचा जन्म शिंदखेडा तालुक्यातील तापी काठावरील
शेंदवाडे या छोट्याशा आदिवासी टोकरे कोळी समाजाची वस्ती असलेल्या गावात झाला.
मनुबाईंच्या आई – वडिलांची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यांचा विवाह जवळच दोन किलोमीटर अंतरावरील तापी काठच्या साहुर गावातील रामभाऊ अवचित सोनवणे यांच्याशी झाला. त्यांच्या संसार वेलीवर ३ मुले व ५ मुली अशी अपत्य रूपाने एकूण नऊ फुले उमलली. मोठे कुटुंब त्यात परिस्थिती बेताची त्यामुळे अठरा विश्व दारिद्रय नशिबी आले. अशा परिस्थितीत कुटुंबाचा गाडा हाकायचा कसा? ही चिंता मनुबाईना सतावत होती. सासरी ५ दिर – जेठ व त्यांचा परिवार याची सर्व जबाबदारी कुटूंबातील मोठ्या असल्याने मनुबाई यांच्यावर होती. यामुळे सर्वांचा उदरनिर्वाह चालवताना त्यांना खुप काबाडकष्ट करावे लागत असत. केवळ पती रामभाऊ सोनवणे यांच्यावरच न अवलंबून राहता मनुबाई स्वतः सर्व मुलांना सोबत घेऊन शेतीत राबत असत. मुलांना चांगले संस्कार देऊन त्यांनी कुटुंबाला पुढे आणण्यासाठी धडपड सुरू ठेवली. मोठ्या मुलाचे म्हणजे बाबुराव सोनवणे यांचा विवाह केला. मुलींचे लग्न जुळवून सासरी पाठविले. आता आपण आपल्या दुसऱ्या मुलाला शिक्षणासाठी बाहेर गावी पाठविले, तो चांगला शिकून नोकरीला लागला तर आपली परिस्थिती सुधारेल, या भावनेतून त्यांनी शानाभाऊ सोनवणे या मुलास शिक्षण घेण्यासाठी लोणखेडा येथे बहिणीकडे पाठवले. शानाभाऊ यांनी आपल्या आईचे स्वप्न साकार करण्यासाठी लोणखेडा त्यानंतर धुळे येथे शिक्षण घेऊन शिक्षकाची नोकरी मिळवली.
मुलाने मिळविलेले यश पाहून मनुबाई यांना अश्रू अनावर झाले.                                             कुटुंबाला पुढे आणण्यासाठी आईचे कष्ट आणि मेहनत याची जाणीव ठेवून शानाभाऊ यांनी वाटचाल सुरू केली. सामान्य माणसांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणाऱ्या शानाभाऊना जनतेने पंचायत समिती सदस्य पदी निवडून दिले. मुलाच्या विजयाचा आनंद चेहऱ्यावर असतानाच पती रामभाऊ सोनवणे यांची तब्येत खालावली. मनुबाई तन मनाने सेवा करत असताना पतीचे निधन झाले. त्यानंतर कुटूंबाची सर्व जबाबदारी मनुबाईवर आली. मात्र, त्या खचल्या नाहीत. आपल्या परिवाराला हिम्मत देत परिस्थितीला सामोरे गेल्या. धमांणे जिल्हा परिषद गटात सुन सौ. सुनिता शानाभाऊ सोनवणे यांना जिल्हा परिषद सदस्या म्हणून प्रचंड मतांनी निवडून आल्या.

मोठा मुलगा बाबुराव सोनवणे व लहान मुलगा नानाभाऊ सोनवणे यांनी पंचक्रोशीतील एक आदर्श शेतकरी म्हणुन ओळख निर्माण केली आहे. एकंदरीत अत्यंत कठीण परिस्थितीत सुद्धा मनुबाई यांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार करून आदर्श कुटुंब घडविले.                                                      ग.भा. मनुबाई यांची १७/९/२०२५ रोजी तब्येत खालावल्याने मुलांनी त्यांना तात्काळ दोंडाईचा येथे उपचार करण्यासाठी शांती हाॅस्फिटल येथे दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच दिनांक २२/०९/२०२५ वार सोमवार रोजी सकाळी ठिक १०:३० वाजता त्यांची जीवनज्योत अनंतात विलीन झाली. मातृछत्र हरपल्याने सोनवणे परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ग. भा. मनुबाई रामभाऊ सोनवणे यांची अंत्ययात्रा दिनांक २३/०९/२०२५ वार मंगळवार रोजी सकाळी ठिक ११:०० वाजता साहुर ता शिंदखेडा जि. धुळे येथुन निघणार आहे. त्यांच्या पश्चात तिन मुले, तिन सुना, नात, नातु, पनतु, पनती, पाच मुली, जावाई असा परीवार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776716246.6326cf7f Source link

error: Content is protected !!