शिंदखेडा शहर भाजपा कडून
पं दीनदयाळ उपाध्याय जयंती सफाई अभियानाने साजरी. ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत
: संपूर्ण भारतामध्ये महान व्यक्ती पंडित दीनदयाळ उपाध्याय यांची जयंती दि २५ सप्टेंबर रोजी साजरी केली जाते.
शिंदखेडा येथे भाजप मंडळातर्फे पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त शहरातील बस स्थानकात प्रतिमा पूजन करून गटनेते अनिल वानखेडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपाध्याय यांच्या कार्याची माहिती शहराध्यक्ष संजयकुमार महाजन यांनी दिली. आपल्या मनोगतात सांगताना महाजन म्हणाले की पंडित दीनदयाळ उपाध्याय आजच्या नव्या पिढीसाठी एक प्रेरणास्रोत असणारे व्यक्तिमत्व होते.अत्यंत हालकीतुन जीवनाचा प्रवास सुरू करून समाजाच्या शेवटच्या घटकांसाठी काम करणार व्यक्तिमत्व खऱ्या अर्थाने प्रेरणादायी होते. लहानपणीच आई-वडिलांचे मायेचे छत्र हरपलं आणि जीवनाच्या संघर्षाला सुरुवात झाली अशा परिस्थितीमध्ये शालेय शिक्षण पूर्ण करून विसाव्या वर्षी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ हेडगेवार यांच्या सहवासात येऊन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम सुरू केले . आपलं संपूर्ण जीवन हे राष्ट्र सेवेसाठी अर्पित केले. साधी राहणी उच्च विचार ही त्यांची जीवनशैली हे त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनलं. शास्त्र धर्मग्रंथ एकात्म मानव वाद हा सिद्धांत मांडला व हा भारतीय जीवनाचा एक अंग बनला. शिक्षणतज्ञ, राजकारणाचे जाणकार, पत्रकार, लेखक तत्वज्ञानी अशी त्यांची ओळख होती .त्यांच्या कार्याचा आवाका खूप मोठा होता गरिबाच्या गरीबातल शेवटच्या घटकाचा विचार ते नेहमी करायचे. जनसंघाचे ते महामंत्री म्हणून नंतरच्या काळात अध्यक्ष म्हणून त्यांचं काम खूप मोठं होतं.४३ दिवस ते अध्यक्ष होते.आज त्यांच्या पुण्याई मुळेच आज भारतीय जनता पक्षाची भरभराट आपण पाहत आहोत. अंत्योदय दिवस दरवर्षी २५ सप्टेंबर रोजी साजरा केला जातो. हा दिवस भारतीय समाजातील गरीब आणि वंचितांच्या उत्थानासाठीचे समर्पण प्रतिबिंबित करतो. अंत्योदय म्हणजे शेवटच्या माणसाचा उदय, म्हणजेच समाजातील सर्वात गरीब आणि मागासलेल्या व्यक्तीला समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. हा दिवस महान समाजसुधारक आणि भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्याशी संबंधित आहे, ज्यांनी अंत्योदयाची कल्पना आपल्या जीवनाचे मुख्य ध्येय बनवली. आजीवान त्यांनी भारतीय जनता पक्षाचे काम करून राष्ट्रास प्रेरणादायी ठरले.नगरपंचायत मधील सफाई कामगारांसह अधिकाऱ्यांनी, पदाधिकाऱ्यांनी संपूर्ण बस स्थानकाची साफसफाई करून स्वच्छता केली. कार्यक्रमास यांची भाजपचे माजी उपनगराध्यक्ष भिला पाटील, प्रकाश देसले, उल्हास देशमुख, माजी नगरसेवक दीपक चौधरी, चेतन परमार, उदय देसले,सुरज देसले,बाळासाहेब गिरासे, अँड विनोद पाटील, माजी पं स सदस्य सुभाष माळी, प्रकाश चौधरी, न पं मुख्याधिकारी श्रीकांत फागणेकर, अभियंता विपुल साळुंखे, आगार प्रमुख योगेश्वर शिवदे,सुयोग भदाणे,रमेश भामरे, दगा चौधरी, वाय पी खैरनार, भूषण पवार, जितेंद्र सूर्यवंशी,मुकेश बडगुजर,गुलाब सोनवणे, नाना कुवर, भूपेंद्र देवरे,दिनेश गोसावी ए नागरिकांसह सफाई कामगार नी सहभाग घेतला.














