Homeताज्या बातम्याशिंदखेडा शहरात लक्ष्मी रमणा गोविंदा चा जयघोष 👉 शिंदखेडा तील रथोत्सव मोठ्या...

शिंदखेडा शहरात लक्ष्मी रमणा गोविंदा चा जयघोष 👉 शिंदखेडा तील रथोत्सव मोठ्या उत्साहात ..

शिंदखेडा शहरात लक्ष्मी रमणा गोविंदा चा जयघोष                                                          👉 शिंदखेडा तील रथोत्सव मोठ्या उत्साहात ..       ✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत        👉 140 वर्षांची परंपरा असलेला शिंदखेडा शहरातील बालाजी रथोत्सव मंगळवारी दि.०७/१०/२०२५ रोजी दुपारी एक वाजता जागेवरून हलला आणि शहरातील रथगल्लीपासुन रथ मिरवणूकीला सुरुवात करण्यात आली. सकाळी ८ वा. सुदर्शन चक्र मिरवणूक रथ मार्गानेच निघाली. सुदर्शन चक्र मिरवण्याचा मान परंपरेनुसार गिरासे परिवाराला असुन धनंजय गिरासे, रोहित गिरासे यांना दिला. रथावर आरुढ होण्यापुर्वी श्रीची पुजा मठाधिपती मेघशाम बुवा यांच्या हस्ते करण्यात आली.पुजा विधीचे कार्य राहुल जोशी व देवेंद्र जोशी यांनी केले.त्यानंतर रथाजवळ मध्यभागी श्री. व्यंकटेश बालाजींची मूर्ती ठेवण्यात आल्यानंतर मठाधिपती मेघश्याम बुवा यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली.दुपारी साडेबारा वाजता वंशपरंपरेनुसार राऊळ राजघराण्याचे वंशज हिंमतसिंह भिमसिंह राऊळ यांच्या हस्ते श्रीबालाजी महाराजांची आरती होऊन दुपारी एक वाजेपासून रथोत्सवाला *’राधे रमणा गोविंदा’, लक्ष्मी रमणा गोविंदा,* च्या गजरात व ढोल ताशा, लेझीम, मल्लखाब, मंगल वादयाने सुरुवात झाली. यावेळी श्री बालाजी रथ पालखी संस्थेचे पंच मंडळ, मोगरीवाले, घनवाले इतर सहकारी, स्वयंमसेवक, रथ ओढणारे भाविक भक्त यांची उपस्थीती होती.
रथावर श्री बालाजींची मुर्ती आरुढ झालेनंतर या रथावर १५ ब्राह्मण वृंद रथमिरवणुकीत सहभागी झाले. रथाला फुलांनी व विद्युत रोषणाईने सुधीर जोशी व भाऊसाहेब माळी यांनी सजवली आहे.रथ नियमनासाठी मोगरीवाले दयाराम दादा, विठ्ठल माळी, कोमलसिह राजपूत, अनिल लोहार, गिरीश लोहार, जीवन लोहार आदिचे योगदान असुन खंडू मिस्तरी व भटु मिस्तरी चिंचेच्या लाकडापासून मोगऱ्या तयार केल्या होत्या. मंगल वाद्याची जबाबदारी जगन्नाथ गुरव यांच्याकडे आहे रथाचा मार्ग रथचौक, तेराघर मोहल्ला, कोळीवाडा, परमार गल्ली, शनी मंदीर चौक, गणपती मंदिर, गांधी चौक, मेनरोड, देसाई गल्ली या मार्गाने रथ मार्गस्थ होऊन रात्री उशिरापर्यंत मिरवणूक सुरू राहते. रथोत्सवात कोणतीही अघटित घटना घडू नये यासाठी अरविंद देसाई, हिंमतसिंह राऊळ, देविदास बापू पाटील,हिंमतसिंह राऊळ, चेतन शिंपी, श्रीराम चौधरी,उदय वानखेडे, जीवन भामरे, मधुकर मराठे, सुरेश माळी पंचमंडळ लक्ष ठेवून असतात.संतोष पाटील, बारकु बडगुजर, मोतीलाल बडगुजर, अशोक बडगुजर हे हयावेळी सेवा देत होते. हयाप्रसंगी रावेर येथील शिव फुले मर्दानी आखाडयातुन रथोत्सवात ठिकठिकाणी मर्दानी खेळाचे प्रात्यक्षिक करत होते.शिंदखेडा पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर वारे, यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड,श्री. देशमुख, गोपणीय अनंत पवार यांचा चोख पोलिस बंदोबस्त पाहायला मिळाला.बालाजी मित्र मंडळ व समस्त नगरवासियाचे रथोत्सव यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य लाभत आहे.हयाप्रसंगी गटनेते रावसाहेब अनिल वानखेडे, प्रकाश देसले, प्रवीण माळी, डॉ. रविंद्र देसले, प्रकाश चौधरी,युवा नेते जिल्हाध्यक्ष सुरज देसले,हेमांगी शाम सनेर, इंदिरा रामकृष्ण पाटील, राजेंद्र देसले,राजेंद्र राजपूत, राकेश चौधरी सह अनेक राजकीय, सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी रथोत्सवास बालाजीचे दर्शन घेत आहेत. हयावेळी विविध दुकाने थाटली आहेत. जिलेबी, गोळसेव, भजी चा खमंग आस्वाद भाविक घेताना दिसुन आले.
पालखी उत्सव आज बुधवारी होणार             श्रीबालाजी मंदिरापासून श्री व्यंकटेशाची मूर्ती विधिवत पूजा करून पालखीत ठेवण्यात येते. सायंकाळी सहा वाजता पालखी महोत्सवाला सुरुवात होईल. पालखी महोत्सवात विविध वहन, नृत्य पथक त्याचप्रमाणे यावर्षीचे खास आकर्षण म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड असलेले आंतरराष्ट्रीय स्तराचे पंजाबचे दलेर खालसा ग्रुप यांचे शौर्य प्रदर्शन प्रात्यक्षिक शिंदखेडा शहरातील चौका चौकात पालखी उत्सवानिमित्त दाखवणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776770712.65bd3918 Source link

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा...

मोघण(धुळे) येथे मोंढ्या महाराज यात्रेनिमित्त कुस्त्यांची दंगल यशस्वीरीत्या संपन्न .. ✍️ शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) दिनांक २० एप्रिल रोजी मोघण तालुका धुळे जिल्हा...

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील)

पुणे-संगमनेर-धुळे(राजगुरुनगर मार्गे) एसटी सेवेचा शुभारंभ,, ✍️शिंदखेडा माझा (पुणे प्रतिनिधी -राकेश बेहेरे पाटील) (पुणे)राजगुरुनगर : अक्षय्य तृतीयेच्या मुहूर्तावर पुणे-राजगुरुनगर-संगमनेर मार्गे धुळे या नव्या एसटी बस सेवेचा राजगुरुनगर...

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776752669.64620de6 Source link

प्रवेश नाकारला

प्रवेश नाकारला तुम्हाला या सर्व्हरवर " प्रवेश करण्याची परवानगी नाही. संदर्भ #18.9a621302.1776734368.63adef06 Source link

error: Content is protected !!