शिंदखेडा तालुक्यातील तामथरे मंडळ भाग येथे सेवा पंधरवाडा कार्यक्रम शिबीर संपन्न. ✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत.)
शिंदखेडा तालुक्यातील मंडळ भाग तामथरे अंतर्गत मौजे तामथरे येथे महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागा मार्फत विठ्ठल मंदिर सभागृह येथे महाशय उपविभागीय अधिकारी तथा प्रांत साहेब श्री शरदजी मंडलिक साहेब व मा. तहसीलदार श्री संभाजी पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाने छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान अंतर्गत सेवा पधरंवाडा व छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत जिवंत सातबारे टप्पा 1 व टप्पा 2 अंतर्गत सातबारे वाटप, जातीचे दाखले, उत्पन्न दाखले, agristrag प्रमाणपत्र व डी बी टी पोर्टल वर नोंदणी व आधार प्रामाणिकरण शिबीर आयोजित करण्यात आले होते शिबिराच्या अध्यक्ष स्थानी महसूल नायब तहसीलदार श्री विजय गोस्वामी प्रमुख उपस्थिती माजी जिल्हा परिषद सदस्य विरेंद्रसिंग गिरासे, भूपेंद्रसिंग गिरासे,माजी सभापती डॉ. दीपक बोरसे, माजी सभापती रणजितसिंग आनंदसिंग गिरासे,मंडळ भागातील सर्व सरपंच, पोलीस पाटील,ग्रामस्थ, शेतकरी बांधव,जेष्ठ नागरिक यांच्या उपस्थितीत सदर कार्यक्रम पार पडला
DBT प्रणाली साठी मंडळ अधिकारी श्री मुकेश भावसार व मंडळ अधिकारी सुनील कनके व त्यांची पूर्ण टिम उपस्थित होती
सदर कार्यक्रमाचे नियोजन मंडळ अधिकारी श्री मनोज गोसावी, ग्राम महसूल अधिकारी श्री उमेश पाटील, श्री प्रशांत खैरनार, श्रीमती काजल केदारे, श्री आतिश कांबळे व मंडळ भागातील सर्व महसूल सेवक यांनी केले
सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी श्रीमती काजल केदारे यांनी केले, प्रास्ताविक तसेच आभार प्रदर्शन मंडळ अधिकारी श्री मनोज गोसावी यांनी केले















