अक्कलपाडा डावा कालव्याच्या tमाध्यमातून कोठारे धरण शंभर टक्के भरले. 👉 मा. जि. प. सदस्य विरेंद्रसिंग गिरासे यांच्या हस्ते पुषपहार व नारळ वाहुन केले जलपूजन.
✍️ शिंदखेडा माझा संपादक यादवराव सावंत. आज दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी मा ना श्री जयकुमार भाऊ रावल साहेब मंत्री, पणन व राजशिष्टाचार महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तथा पालकमंत्री धुळे यांच्या आदेशान्वये अक्कलपाडा डावा कालव्याच्या माध्यमातून कोठारे धरण शंभर टक्के भरण्यात आले म्हणून जय भोले पाणीवाटप सोसायटी चे चेअरमन काशिनाथ भाऊसाहेब माळी (रामी) व त्यांच्या संचालकांनी चिमठाणे गटाचे मा जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र आबा गिरासे यांना जलपूजनाचे निमंत्रण दिल्याने त्यांनी आज रोजी कोठारे धरणनाच्या पाण्यात पुष्पहार व नारळ वाहून जलपूजन केले. याप्रसंगी जय भोले पाणी वाटप सोसायटीचे चेअरमन काशिनाथ भाऊसाहेब माळी, तामथरे ग्रामपंचायत माजी उपसरपंच तथा उत्कृष्ट शेतकरी मनोहर चौधरी, ज्ञानेश्वर गिरासे, काशिनाथ आबा चौधरी, रवींद्र गिरासे, देवेंद्र गिरासे, राजेंद्र गिरासे, निलेश गिरासे आदी शेतकरी यावेळी उपस्थित होते. सदर शेतकऱ्यांनी मा ना श्री जयकुमार भाऊ रावल यांचे अमराळे, तामथरे, रामी, बेहेड परिसरातील शेतकऱ्यांनी विशेष आभार व्यक्त केले. सदर कोठारे धरण 100% भरल्याने परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसाठी मुबलक पाणी उपलब्ध झाल्याने शेतीत चांगल्या प्रकारे उत्पन्न येऊन शेतकऱ्यांच्या जीवनमानात अमुलाग्र बदल घडून येईल, शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल असे यावेळी मा जिल्हा परिषद सदस्य विरेंद्र आबा गिरासे यांनी मनोगत व्यक्त केले तसेच सदर कोठारे धरणातून सांडव्याने अतिरिक्त पाणी हे शेवरी नदीतून बुराई नदीत जात आहे. कार्यकारी अभियंता आय.एस. पढार, उप अभियंता गिरीश महाले, सहाय्यक अभियंता गणेश चौधरी, कालवा निरीक्षक किशोर राजपूत यांनी विशेष सहकार्य केले.















