शिंदखेडा तालुक्यातील अलाने येथे ग्रामसभेत जीएसटीत सूट दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी चा अभिनंदनाचा ठराव 👉 असा ठराव करणारी तालुक्यात नव्हे जिल्ह्यात पहिली ग्रामपंचायत
✍️ शिंदखेडा माझा (संपादक यादवराव सावंत)
तालुक्यातील अलाने ग्रामपंचायत मध्ये देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला अलाने ग्राम पंचायत मध्ये १५ सप्टेंबर रोजी सरपंच श्रीमती रमनबाई गिरासे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले त्यात देशाचे पंतप्रधान माननीय ना. नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जीएसटी कमी करण्याच्या निर्णयाचा फायदा सर्वसामान्य नागरिकांना होणार असल्याने त्यांचा अभिनंदनचा प्रस्ताव
ठेवण्यात आला त्यात सर्व गावकरी नी ठराव एकमताने मंजूर केला
आज ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी म्हणून डी एस गिरासे, कु.उ.बा. समिती मुंबईचे संचालक जिजाबराव पाटील, देवेंद्र गिरासे ग्रामसेवक गजानन पवार यांनी ठरावाची प्रत गटविकास अधिकारी रमेश नेतनवार यांना दिले त्या वेळी ते म्हटले की असा ठराव करणारी ही जिल्यातील एकमेव ग्रामपंचायत असल्याचे मत त्यांनी व्यक्त करून सदर ठरावाची प्रत जिल्हाधिकारी धुळे व जीप मुख्यकार्यकारी अधिकारी धुळे यांच्या कडे पाठवल्याचे सांगितले
ठरावात म्हटले आहे की देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ ऑगस्ट च्या आपल्या भाषणात नागरिकांना दिवाळीपर्यंत दिलासा देण्याचे अभिवचन दिले होते परंतु त्याआधीच नवरात्रोत्सवाच्या जीएसटी सुरुवातीलाच सुधारणा लागू करून सर्वसामान्यांच्या जीवनात बदल करून करू त्या दिशेने एक ऐतिहासिक पाऊल उचलून त्याचा थेट फायदा, शेतकरी, महिला, व युवक यांना मिळणार आहे तसेच काही दुर्धर आजारावरील औषधी त्यांच्यावरील टॅक्स ०% पर्यंत केल्याने रुग्णांना देखील यातून दिलासा मिळणार आहे या नवीन कर प्रणालीच्या रचनेमुळे सर्वसामान्यांचा राहणीमानावरील खर्च कमी होऊन बचत वाढणार आहे. त्यामुळे मध्यम व गरीब वर्गासाठी तर ही अतिशय समाधानाची बाब आहे आमच्या मतदार संघाचे आमदार तथा विद्यमान मंत्री नामदार जयकुमार रावल यांच्या माध्यमाने प्रत्येक गावाला मूलभूत सुख सुविधा देऊन वैयक्तिक लाभाच्या योजना
देखील सर्वसामान्य पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होत असताना त्यासाठी महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडवणीस हे देखील समाजातला शेवटच्या व्यक्तीपर्यंत सरकारच्या विविध योजना पोहोचविण्याचा प्रयत्न करीत असल्याने त्यांचेही आभार व्यक्त करीत, पुनश्च एकदा माननीय पंतप्रधान नरेंद्र जी मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचे अभिनंदन करीत, असल्याने अभिनंदनाचा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सदर ठरावाचे सूचक श्री दरबारसिंग शंकरसिंग गिरासे माजी अध्यक्ष संजय गांधी निराधार योजना यांनी मांडला त्याला सौ जागृती भिका पाटील माजी ग्रा.पं. सदस्या यांनी या ठरावाला अनुमोदन दिले. व गावकऱ्यांनी ठराव सर्वसंमतीने मंजूर करण्यात आला असल्याचे म्हटले आहे.















